मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Malegaon Crime : बंगल्यात पती रक्ताच्या थारोळ्यात तर पत्नीचा अर्धवट जळालेला मृतदेह, मालेगावातील घटनेने खळबळ

Malegaon Crime : बंगल्यात पती रक्ताच्या थारोळ्यात तर पत्नीचा अर्धवट जळालेला मृतदेह, मालेगावातील घटनेने खळबळ

मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एका घरात पती, पत्नीचं मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एका घरात पती, पत्नीचं मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एका घरात पती, पत्नीचं मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

मालेगाव, 17 नोव्हेंबर : मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एका घरात पती, पत्नीचं मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काल (दि.16) अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. दरम्यान वृद्ध पती पत्नीचा मृतदेह आढळल्याने हा घातपात आहे की आणखी काही याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. घटनास्थळी धाव घेत पोलीसांनी तापासाची चक्रे फिरवली आहेत. दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.

अल्ताफ हुसेन आणि अल्तमश बानो अशी या दोघांची नावे आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत पत्नीचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत तर पतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे.

हे ही वाचा : त्या रात्री नेमकं काय घडलं? श्रद्धाला का मारलं? हत्या प्रकरणात आफताबचा मोठा खुलासा

दोघे नवरा बायको वयस्कर आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून हा घातपाताचा प्रकार आहे कि आणखी दुसरं याचा पोलीस तपास करीत आहेत.

पुण्यातल्या घटनेने खळबळ

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंधातून खुनाच्या, आत्महत्येच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आली आहे. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून तिच्या प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

हे ही वाचा : श्रद्धाचे 35 तुकडे करताना आफताब झाला होता जखमी, त्यानंतर...

विकास माळवे असे मृत प्रियकराचे नाव आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली. आत्महत्या करण्याआधी प्रियकराने सुसाईड नोट लिहून गंभीर आरोप केला होता. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, अद्याप संशयित आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Crime, Crime news, Nashik, Nashik suicide