जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करताना आफताब झाला होता जखमी, त्यानंतर...

Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करताना आफताब झाला होता जखमी, त्यानंतर...

आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले आणि  300 लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर तो एक-एक तुकडा शहराच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात फेकत राहिला

आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले आणि 300 लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर तो एक-एक तुकडा शहराच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात फेकत राहिला

आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले आणि 300 लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर तो एक-एक तुकडा शहराच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात फेकत राहिला

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर :  संपूर्ण देशासह राजधानी दिल्लीला हादरावून सोडणाऱ्या श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे.  आफताब पूनावाला नावाच्या व्यक्तीनं लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. श्रद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची कसून चौकशी सुरू आहे. या खून प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आरोपी आफताबवर उपचार करणारे डॉक्टरही तपासकार्यात सहकार्य करण्यासाठी पुढे आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले आणि  300 लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर तो एक-एक तुकडा शहराच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात फेकत राहिला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आरोपीला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला दक्षिण दिल्लीतील छतरपूर येथील जंगलात नेलं होतं. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे याच जंगलात फेकून दिले होते. सुमारे 3 तास पोलीस तिथे शोधकार्य करत होते. यादरम्यान, मे महिन्यात जखमी आफताबवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी समोर येऊन अधिक माहिती दिली आहे. (प्रेयसीवर एवढं प्रेम की थेट घेतला जीव अन् म्हणाला…‘सॉरी बाबू स्वर्गात भेटू…’) आफताब पूनावाला याच्यावर उपचार करणारे डॉक्टर अनिल कुमार मीडियासमोर आले आहेत. प्रेयसीच्या हत्येचा आरोप असलेला आफताब मे महिन्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे आला होता, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याच महिन्यात श्रद्धाची हत्या झाल्याची चर्चा आहे. आफताबच्या हाताला जखम झाली होती, तो त्यावर उपचार करण्यासाठी आला होता. फळं कापताना जखम झाल्याचं दिलं होतं कारण पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आफताब डॉ. अनिल कुमार यांच्याकडे आला होता तेव्हा तो खूपच आक्रमक आणि अस्वस्थ दिसत होता. त्यांनी त्याला जखमेचं कारणही विचारलं होतं. तेव्हा त्यानं फळं कापताना हाताला दुखापत झाल्याचं सांगितलं होतं. डॉ. अनिल कुमार म्हणाले, “मे महिन्यात एका सकाळी आफताब माझ्याकडे आला होता. एक व्यक्ती उपचारांसाठी आल्याची माहिती माझ्या सहाय्यकानं मला दिली होती. मी जखमेची तपासणी केली असता ती जास्त खोल नव्हती. मी त्याला दुखापतीचं कारणही विचारलं होतं. फळ कापताना लागल्याचं त्यानं सांगितलं होतं. चाकू लागल्यामुळे हाताला जखम झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे मला त्यानं दिलेल्या कारणाबाबत अजिबात शंका आली नाही.” (Shraddha Walker Murder : श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबकडून झाली एक चूक, ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात!) डॉक्टर कुमार यांच्या म्हणण्यानुसार, उपचारांदरम्यान त्यांना आफताब काहीसा आक्रमक आणि अस्वस्थ दिसला. पण, तो घाबरलेला आहे असं अजिबात वाटतं नव्हतं. तो डॉक्टरांच्या डोळ्यात बघून बोलत होता आणि न घाबरता सर्व प्रश्नांची उत्तरं देत होता. विशेष म्हणजे तो इंग्रजीत बोलत होता आणि आयटी क्षेत्रातील चांगल्या संधींच्या शोधात मुंबईहून दिल्लीत आल्याचं तो म्हणाला होता. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी आफताबला डॉ. कुमार यांच्या रुग्णालयात नेलं. तेव्हा आफताबने किती मोठा गुन्हा केला आहे, हे डॉक्टरांना समजलं. पोलिसांनी विचारणा केली असता डॉक्टरांनी त्याला ओळखलं आणि पोलिसांना मदत केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Murder
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात