मुंबई, 14 फेब्रुवारी : मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यासोबत एका उच्चशिक्षित दाम्पत्याने धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कायदा, माहिती व तंत्रज्ञान, जादूटोणा कायद्यासह, अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न यानुसार या दाम्पत्यावर गुन्हा नोंदवला. याप्रकरणी आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यावर आरोपीने मित्रांकडूनही अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकेच नव्हे तर याप्रकरणी पोलिसांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले, आरोपही या विद्यार्थ्याने केला आहे. पीडित विद्यार्थी हा मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. सध्या हा 33 वर्षीय विद्यार्थी पीएच.डी.चे शिक्षण घेत आहे. 9 मे 2019 मध्ये त्याची शुभ्रो बॅनर्जीशी ओळख झाली. तो एका नामांकित मद्य कंपनीत प्रमुख पदावर कार्यरत आहे. त्याने, तो उद्योजक, तज्ज्ञ असल्याचे भासवून त्याच्यासोबत जवळीक वाढवली. यानंतर यूपीएससी आणि पीएचडी साठी मदत करण्याच्या बहाण्याने अनैसर्गिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर तो पहाटे उठवून मंत्र जाप करत अंगावर चटके द्यायचा आणि तांत्रिक सेक्स करायचा. त्याने लग्नाचे आमिष दाखवून या आयआयटीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केले. तसेच वेळोवेळी मित्रांनी आयोजित केलेल्या ग्रुप सेक्स पार्टीमध्येही तो पीडित विद्यार्थ्याला बोलवायचा. शुभ्रोने मित्रांसाठी ड्रग्ज आणण्यासाठीही त्याच्यावर दबाव टाकल्याचे विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कायदा, माहिती व तंत्रज्ञान, जादूटोणा कायद्यासह, अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न यानुसार या दाम्पत्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपासात केल्यावर आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हेही वाचा - समलैंगिक ॲपवरून ओळख, IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार, तंत्रविद्येचाही वापर, मुंबईतील हादरवणारी घटना
शुभ्रो बॅनर्जी आणि मनश्री असे या आरोपी उच्च शिक्षित दाम्पत्याचे नाव आहे. पवईतील क्रिस्टल टॉवरमध्ये ते राहतात. शुभ्रोची आयआयटीतील एका 33 वर्षीय विद्यार्थ्याशी समलैंगिक ॲपवरून ओळख झाली होती. या ओळखीनंतर शुभ्रोने या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. विद्यार्थ्यावर वसतिगृहातील खोलीत आणि घरी शुभ्रोने हे अत्याचार केले.
आरोपी म्हणाला, तू माझी संपत्ती - प्रत्येक गोष्टीसाठी आरोपीची परवानगी घेणे भाग पडत होते. आरोपी शुभ्रोने गुलाम बनवून तू माझी संपत्ती आहे, असे सांगत अत्याचार केल्याबाबतही विद्यार्थ्याने म्हटले आहे. यापूर्वी 2020 मध्ये सुरुवातीला रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात पहिल्यांदा तक्रारीसाठी गेला होता. मात्र, तेथे पोलिसांनी त्याची तक्रार न घेता तेथून निघून जाण्यास सांगितले. पुन्हा दिसू नये, म्हणून दमही दिला. त्यानंतर पवई पोलिसांनी तक्रार घेण्यासाठीही अनेक दिवस पायपीट केल्यानंतर तीन महिन्यांनंतर गुन्हा नोंदवल्याचे विद्यार्थ्याने म्हटले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर अटकेची कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्याने केली आहे.