मुंबई, 11 ऑगस्ट : आज राखीपौर्णिमा असल्याने बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जाणारे भाऊ अडचणीत सापडले आहेत. सणाच्या दिवसात त्यातही राखीपौर्णिमा आणि भाऊबीजेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. तर लोकलमध्येही तुफान गर्दी असते. मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली ते माजिवाडा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. आज राखीपौर्णिमा असल्याने रक्षाबंधनासाठी जाणारे भाऊ या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप, अचानक आलेल्या मुसळधार पावसाने वाहनांची लागली वाट, गोदावरीला पूर, थरारक VIDEO भिवंडी तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली ते माजिवाडा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून तब्बल पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली ते माजिवाडा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. आज राखीपौर्णिमा असल्याने रक्षाबंधनासाठी जाणारे भाऊ या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. pic.twitter.com/9PtuL6Lma1
— News18Lokmat (@News18lokmat) August 11, 2022
आज रक्षाबंधनाचा सण असल्याने अनेकजणं वाहनं घेऊन बाहेर पडल्याने बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जाणारे अनेक भाऊ या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. तर रुग्णावाहिका देखील अडकल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र ही वाहतूक केव्हा सुरळीत होणार याचीच वाट प्रवाशी पहात आहेत. दरम्यान, राज्यात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे आहे. मागच्या 24 तासांता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक 330 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 200 मिलिमीटपेक्षा जास्त पाऊस पडल्याने नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

)







