मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप, अचानक आलेल्या मुसळधार पावसाने वाहनांची लागली वाट, गोदावरीला पूर, थरारक VIDEO

नाशिकमध्ये पावसाचा प्रकोप, अचानक आलेल्या मुसळधार पावसाने वाहनांची लागली वाट, गोदावरीला पूर, थरारक VIDEO

नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं.

नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं.

नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं.

  • Published by:  Chetan Patil
नाशिक, 7 ऑगस्ट : नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विशेष म्हणजे गोदा काठावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक वाहनं पाण्याखाली गेली. फक्त पार्किंगमधील वाहनंच नाहीत तर गोदा काठावरील दुकानांना देखील पुराच्या पाण्याने वेढा घातला. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या. अतिशय थरारक असा पावसाचा हा प्रसंग होता. पाऊस थांबल्यानंतर स्थानिक यंत्रणांच्या मदतीने वाहने काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्याप्रसंगाचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पुराच्या पाण्यात रिक्षा, चारचाकी वाहनं अडकलेली दिसत आहे. एक कार तर वाहत जावून थेट खड्ड्यात पडल्याचं दिसत आहे. काही नागरिक रिक्षा आणि इतर वाहनांना पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (एका मैत्रीची रंजक कहाणी, शिंदे-फडणवीसांच्या दोस्तीवर अमृता फडणवीसांची खास पोस्ट) महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातेय. पावसाचं हे आक्राळविक्राळ रुप पुढच्या पाच दिवसांसाठी तसंच असू शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
First published:

पुढील बातम्या