Home /News /maharashtra /

Hanuman जन्मभूमीवरुन मतमतांतर; हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? महंत गोविंद दास यांच्याकडून जन्मस्थळ सिद्ध करण्याचं महंतांना आव्हान

Hanuman जन्मभूमीवरुन मतमतांतर; हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? महंत गोविंद दास यांच्याकडून जन्मस्थळ सिद्ध करण्याचं महंतांना आव्हान

Hanuman जन्मभूमीवरुन मतमतांतर; हनुमानजींचं जन्मस्थळ कुठलं? नेमकं प्रकरण काय?

Hanuman जन्मभूमीवरुन मतमतांतर; हनुमानजींचं जन्मस्थळ कुठलं? नेमकं प्रकरण काय?

Row over Lord Hanuman's birthplace: हनुमानजींच्या जन्मस्थळावरुन आता मतमतांतर झाल्याचं दिसून येत आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 28 मे : राम जन्मभूमीनंतर (Ram Janmabhoomi) आता हनुमानजींच्या जन्मस्थळावरून (Lord Hanuman Birthplace) वादंग पहायला मिळत आहे. कर्नाटकातील किष्किंधा हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंद दास यांनी केला आहे. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत त्यांनी हा दावा केला आहे. इतकेच नाही तर महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून नाशिकच्या नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. हनुमानजींचं जन्मस्थळ अंजनेरी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंद दास यांनी फेटाळून लावला आहे. हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ आणि वादविवाद करण्यासाठी महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. त्यातच आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वरात हनुमान जन्मस्थळावरुन साधू-महंतांमध्ये मतमतांतर पहायला मिळत आहे. किष्किंधाचे महंत गोविंद दास यांनी नाशिकमधील महंत, अभ्यासकांना खुलं आव्हान दिलं आहे. हनुमान यांचे जन्मस्थळ किष्किंधा आहे आणि जन्मस्थळाच्या संदर्भात कुठलीही चर्चा करण्यास तयार आहे. तसेच अंजनेरीत हनुमानजींचा जन्म झाला याचा पुरावा देण्याचं आव्हानही त्यांनी दिलं आहे. अंजनेरी हे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. अंजनेरी डोंगरावर हनुमानजींसोबतच अंजनीमातेचंही एक मंदिर आहे. या डोंगरावर हनुमानजींचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं. पण किष्किंधा येथेच हनुमानजींचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हनुमानाचा जन्म आमच्याच भूमीत! दोन राज्यांमध्ये पेटला वाद काही दिवसांपासून हनुमानाच्या जन्मस्थळावरून (Lord Hanuman Birth Place) कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वादंग निर्माण झाला आहे. दोन्ही राज्यांनी हनुमानाचा जन्म आपल्या राज्यात झाल्याचा दावा केला आहे. कर्नाटकमधल्या शिवमोगा जिल्ह्यातील एका धार्मिक नेत्याने दावा केला आहे की भगवान हनुमानांचा जन्म कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्णामध्ये (Gokarna) झाला होता. या आधीही कर्नाटकनेच हनुमानाचा जन्म कोप्पल जिल्ह्यातील किष्किंधा इथल्या अंजनेरी पर्वतावर झाल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे आंध्रप्रदेशचा दावा आहे की हनुमानाची जन्मभूमी सात पर्वतांपैकी एक अंजनेरी (Anjanadri) आहे. कर्नाटकच्या शिवमोगातील रामचंद्रपुर मठाचे प्रमुख राघवेश्वरभारती यांनी त्यांच्या दाव्यात रामायणाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रामायणमध्ये भगवान हनुमान यांनी आपला जन्म गोकर्णमध्ये झाल्याचं सीतामाईला सांगितलं होतं. राघवेश्वर भारती म्हणाले, 'रामायणाशी संबंधित आढळलेल्या पुराव्यांनुसार गोकर्ण हनुमानाची जन्मभूमी असल्याचं स्पष्ट होते. तर किष्किंधेतील अंजनाद्री ही हनुमानाची कर्मभूमी होती.' वाचा : आश्चर्य! आश्रमात सापडलं तब्बल 150 वर्षांपूर्वीचं तूप; सुगंध, ताजेपणा आजही कायम कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील हा वाद सोडवण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून (TTD) तज्ज्ञ समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 21 एप्रिल रोजी अहवाल सादर करेल. या समितीमध्ये वैदिक साहित्याचे जाणकार, पुरातत्व विभागातील वैज्ञानिक आणि इस्रोतील एका वैज्ञानिकाचा समावेश आहे. हा वाद सुरू असतानाच TTD मंदिर व्यवस्थापनाकडून 13 एप्रिलला म्हणजेच तेलुगू नवीन वर्षाच्या दिवशी एक पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून तिरुमालाच्या सात पर्वतांपैकी एक अंजनाद्री पर्वताला भगवान हनुमानाचे जन्मस्थळ आहे, हे सिद्ध होईल. टीटीडी ट्रस्ट बोर्डचे कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी म्हणतात, की त्यांच्याजवळ पौराणिक आणि पुरातत्वाधारित पुरावे आहेत. यांच्या आधारे तिरुपतीच्या अंजनाद्री पर्वतावरच भगवान हनुमानाचा जन्म झाला होता, हे सिद्ध होईल.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Hanuman, Nashik

    पुढील बातम्या