मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : महापालिका देणार महिलांना मोफत रोजगार प्रशिक्षण, 'या' पद्धतीनं करा अर्ज

Nashik : महापालिका देणार महिलांना मोफत रोजगार प्रशिक्षण, 'या' पद्धतीनं करा अर्ज

महिला सक्षम होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या. त्यांनी आपला संसार व्यवस्थित चालवला पाहिजे,त्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी नाशिक महापालिका प्रयत्न करणार आहे

महिला सक्षम होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या. त्यांनी आपला संसार व्यवस्थित चालवला पाहिजे,त्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी नाशिक महापालिका प्रयत्न करणार आहे

महिला सक्षम होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या. त्यांनी आपला संसार व्यवस्थित चालवला पाहिजे,त्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी नाशिक महापालिका प्रयत्न करणार आहे

  • Local18
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Onkar Danke

नाशिक 29 नोव्हेंबर : महिला सक्षम होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या. त्यांनी आपला संसार व्यवस्थित चालवला पाहिजे,त्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी नाशिक महापालिका प्रयत्न करणार आहे. महापालिकेच्या अंतर्गत महिला बाल कल्याण विभाग,इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्युट आणि दिव्या आकांक्षा सामाजिक संस्था यांच्या वतीने महिलांना बेकरी प्रोडक्टचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.

महापालिका अंतर्गत असलेल्या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माजी नगरसेविका अर्चना जाधव यांनी यामध्ये विशेष लक्ष देऊन,आपल्या विभागातील परिसरातील सर्व सामान्य महिला पर्यंत माहिती पोहचवून त्यांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेतलं आहे.पहिल्या बॅच मधील 30 महिलांचे बेकरी प्रोडक्टचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.अगदी चांगल्या प्रकारे सर्व महिला बेकरी सबंधित सर्व प्रोडक्ट बनवत आहेत.अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका अर्चना जाधव यांनी दिली आहे.

कोणते कोर्स मोफत?

ब्यूटी थेरेपी अँड हेअर स्टाईल, इंटीग्रेटेड कोर्स इन हेअर अँड स्किन मेकअप,  ब्रायडल मेकअप आर्टिस्ट,अकाउंटंट असिस्टंट युजिंग टॅली,कॉम्प्युटर हार्डवेअर असिस्टंट,कॉम्प्युटर नेटवर्क असिस्टंट, डी.टी.पि अँड प्रिंट पब्लिशिंग,टेलरिंग बेसिक,पर्सनल सुरक्षा रक्षक,औद्योगिक सुरक्षा रक्षक,इव्हेंट सुरक्षा रक्षक,बेड साईड असिस्टंट,नर्सिंग एड्स,फार्मसी असिस्टंट,अकाउंटिंग,असिस्टंट फॅशन सेल्स अँड शोरुम रीप्रेझें टेटिव,रिटेल सेल्स असोसिएट,हाऊस किपर,हॉस्पिटॅलिटी असिस्टंट, हाऊस होल्ड सर्व्हिसेस जनरल,फ्रंट ऑफिस कम रिसेप्शनिस्ट हे सर्व कोर्स महिलांना मोफत करण्याची संधी आहे.

कॉलेजातल्या आदिवासी मुलानं बांबूपासून बनवल्या आकर्षक वस्तू, पाहा Video

या सर्व कोर्सचा कालावधी हा साधारण अडीच ते तीन महिन्याचा असणार आहे.पुर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर प्रमाणपत्र देखील देण्यात येईल.

कोणती कागदपत्रं आवश्यक?

1) शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला यापैकी एक

2) आधारकार्ड

3) रेशनकार्ड / घरपट्टी / लाईटबिल / भाडे करारनामा यापैकी एक

4) पासपोर्ट साईज फोटो 6

5) उत्पन्नाचा दाखला,( वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे)

6) वय मर्यादा 15 वर्षे ते 45 वर्षे पर्यंत असावे

7) एका लाभार्थ्यास एकाच कोर्सला प्रवेश घेता येईल

विद्यार्थ्यांना शाळेत मिळतात 'वारली' चित्रकलेचे धडे, कलाकृती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Video

बेकरी कोर्सचा फायदा

अनेक बेकरी प्रोडक्ट हे आपण बाहेरून विकत आणत असतो.ते कसे बनविले जातात.कशा दर्जाचे साहित्य त्यात वापरलेले असते .याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसते. आम्ही हे  इथं शिकलो आहोत. त्यामुळे आम्ही घरी सर्व प्रॉडक्ट्स बनवू शकतो. आम्हाला अनेक पदार्थ चांगल्या प्रकारे बनवता येतात. त्याचबरोबर आम्ही आमचा व्यवसाय देखील उभारू शकतो. या मोफत प्रशिक्षणाचा महिलांना मोठा फायदा होणार आहे,  अशी प्रतिक्रिया अंजली लोखंडे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्युट नाशिक,

सिद्धार्थ कॉम्प्लेक्स,बस स्टॉप शेजारी,पंचवटी कारंजा नाशिक, 422003 फोन नंबर - 7378661001,9689981002

First published:

Tags: Employment, Local18, Nashik