नाशिक 7 नोव्हेंबर : माणूस स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी सतत धडपत असतो.मात्र ज्या भागात आपला जन्म झाला,ज्या भागात लहानचा मोठा झालो, ज्या समाजाने आपल्याला प्रेम दिलं, त्या समाजाचं देखील आपण काही तरी देणं लागतो,हे विसरून चालणार नाही.आणि हेच मनी बाळगत नाशिक च्या पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वर नगर मध्ये राहणाऱ्या अमोल गायकवाड आणि सविता गायकवाड या दांपत्याने अनाथ,पिडीत,बेघर, नागरिकांसाठी सेवाभावी वृत्तीने निसर्ग केअर सेंटर नावाने वृध्दाश्रम सुरू केले आहे. या वृद्धाश्रमाला आता 11 वर्षे पूर्ण झाली असून पन्नास ते साठ आजी-आजोबा यामध्ये राहातात. अमोल आणि सविता त्यांच्या आई वडिलांसारखी इथे राहणाऱ्या आजी आजोबांची काळजी करतात. सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमच्या जवळ त्यांचं हे निसर्ग केअर सेंटर आहे.अमोल आणि सविता यांचं फारस शिक्षण झालं नाही,मात्र त्यांना दोघांना लहानपणापासून समाजसेवेची खूप आवड आहे. सध्या या वृद्धाश्रमात नाशिकच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील ही अनेक आजी आजोबा आहेत. त्यांची सेवा करून खूप आनंद मिळतो,आमच्या या सेवा कार्यात काही सामाजिक संस्थांचा देखील हातभार लागतो. त्यामुळेच हे सर्व शक्य असल्याची प्रतिक्रिया अमोल गायकवाड यांनी दिली आहे. प्रत्येक जण आई-वडिलांसारखा या वृद्धाश्रमात राहणारे प्रत्येक आजी-आजोबा हे आई-वडिलांसारखे आहेत, अशी या दाम्पत्याची भावना आहे. ‘त्यांचं दुःख ऐकल की आपलं ही मन खूप दुःखी होतं, ज्यांना जन्म दिला तीच मुल आज आई वडिलांना सांभाळत नाहीत. त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आहे. तुम्ही घराबाहेर एखाद्या वृद्धाश्रमात आहात, याची जाणीव त्यांना होऊ नये असा आमचा प्रयत्न असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचं जीवन यशस्वी झाल्यासारखं वाटतं. ते देखील आम्हाला मुलासारखं मानतात. मनातील कोणतीही गोष्ट हक्काने सांगतात,’ असा अनुभव सविता गायकवाड यांनी सांगितला.
आता हेच आमचं घर निसर्ग केअर सेंटर हे वृध्दाश्रमच आता आमचं घर बनल आहे.आम्ही सर्व इथे आनंदाने राहतो. आम्हाला कोणाला ही घरची आठवण येत नाही. अमोल आणि सविता हे दोघं आमची खूप काळजी घेतात. आम्हाला लागेल ती वस्तू लगेच आणून देतात. भजन,कीर्तन,प्रवचन, वेगवेगळे मनोरंजन करणारे खेळ खेळले जातात. आम्हाला इथे टीव्ही आहे.त्यामुळे आमचं चांगलं मनोरंजन होत. तसेच आम्हाला बाहेर देखील फिरायला घेऊन जातात.त्यामुळे आता वृध्दाश्रमच आमचं घर झाल्याची भावना इथं राहणाऱ्या एका आजींनी व्यक्त केली.
निराधार वृद्धांना ‘वात्सल्य’ देणारं नाशिकचं सेकंड होम, 11 वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा VIDEO
कुठे आहे निसर्ग केअर सेंटर नाशिक शहरातील पाथर्डी परिसरातील संभाजी स्टेडियमच्या जवळ निसर्ग केअर सेंटर आहे.अधिक माहितीसाठी खालील फोन नंबरवर संपर्क साधू शकता, 91 84467 48999