नाशिक 12 नोव्हेंबर : पाणीपुरी हे नुसते नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सध्याची तरुणाई पाणीपुरीवर अफाट प्रेम करते. पाणीपुरी आवडत नाही असा तरुण मिळणं तसं दुर्मीळच. पाणीपुरी, गुपचूप, गोलगप्पे अशा विविध नावाने ओळखले जाणारे पाणीपुरीचे अनेक प्रकार आहेत. त्यात अनेक प्रयोग देखील झालेले आहेत. मात्र, नाशिक च्या किशोर पाणीपुरी स्टॉलमध्ये अगदी चटपटीत पाणीपुरी मिळते. विशेष म्हणजे ही पाणीपुरी किशोर कडेकर आणि मनिषा कडेकर मूकबधिर दांपत्य बनवते. नाशिककर या पाणीपुरीचे दिवाने असून स्वाद घेतात. सर्व व्यवहार हा हातांच्या इशाऱ्यावर चालतो नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात किशोर पाणीपुरी सेंटर आहे. हे पाणीपुरी सेंटर किशोर कडेकर आणि मनिषा कडेकर मूकबधिर दांपत्य चालवते. त्यांचा सर्व व्यवहार हा हातांच्या इशाऱ्यावर चालतो. बोलता ही येत नाही आणि ऐकू देखील येत नाही. त्यांना अंकुश हा एक मुलगा आहे. दहावी बारावी पर्यंत शिक्षण झालेलं हे दांपत्य मुंबई मध्ये मूकबधिर मुलांच्या शाळेत शिकवण्याचे काम करत होते. मात्र कोरोना काळात त्यांच्या हातची नोकरी गेली आणि ते पुन्हा नाशिकला परतले.
Nashik : झणझणीत मिसळसह खा भजे, नाशिकमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, Video
परंतु इथ घरी बसून काय करणार म्हणून त्यांनी लहान मोठा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात ही त्यांचा जम बसला नाही आणि त्यानंतर त्यांनी जत्रा हॉटेल चौक परिसरात पाणीपुरीचा छोटा स्टॉल लावला काही दिवस अल्पसा प्रतिसाद मिळत होता पण त्यांची क्वालिटी ग्राहकांच्या पसंतीस उतरली,पाणीपुरी,शेवपुरी,भेळपुरी,दहीपुरी, अगदी भन्नाट ते बनवतात आणि अवघ्या 20 रुपयात दर्जेदार पदार्थ मिळत असल्यामुळे ग्राहक या ठिकाणी पाणीपुरी खायला पसंती देतात. त्यांचं गोड हास्य ग्राहकांना मोहून टाकत मूकबधिर असल्यामुळे त्यांना आपल्या ग्राहकांशी बोलता ही येत नाही आणि ऐकू ही येत नाही. त्यामुळे ते हाताच्या इशाऱ्यावरच आपल्या ग्राहकांशी संवाद साधतात. ते ऑर्डर स्वीकारताना ही ग्राहकांना स्मित हास्य देऊनच ऑर्डर स्विकारतात. हे दांपत्य सर्वांनाच प्रेरणादायी ठरत असल्याची प्रतिक्रिया खवय्ये वर्षा देवकर यांनी दिली आहे.
Nashik : भारीच! एकाच हॉटेलमध्ये मिळतात 13 प्रकारचे कढई पोहे, पाहा Video
20 रुपयात उत्तम पाणीपुरी,शेवपुरी, दहीपुरी इथे मिळते या किशोर पाणीपुरी स्टॉलवर अवघ्या 20 रुपयात पाणीपुरी,शेवपुरी,दहिपुरी मिळते. त्यामुळे प्रत्येक दिवशी ग्राहकांची या ठिकाणी मांदियाळी असते.
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे किशोर पाणीपुरी सेंटर हे पाणीपुरी सेंटर नाशिक शहरातून ओझरच्या दिशेला जाताना जत्रा हॉटेल चौकात सर्व्हिसरोडला आहे. सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत हे पाणीपुरी सेंटर खवय्यांसाठी खुले असते. माझ्या आई वडिलांचा मला अभिमान किशोर आणि मनिषा यांना एक मुलगा आहे अंकुश तो सद्या माध्यमिक शिक्षण घेत आहे. त्याला आपल्या दिव्यांग आई वडिलांविषयी खूप अभिमान आहे. त्यांची जगण्याची जिद्द आणि चिकाटी खूप काही शिकवून जाते. माझ्या शिक्षणासाठी ते खूप मेहनत घेतात. त्यांना खूप इच्छा आहे की आपल्या मुलाने शिकून मोठ व्हावं आणि त्यांची धडपड लक्षात घेता मी देखील चांगल शिक्षण घेत आहे. मी जसा वेळ मिळेल तशी आई वडिलांना या पाणीपुरी सेंटरवर मदत करतो. सद्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आई वडीलांसह मी देखील खुश असल्याची प्रतिक्रिया मुलगा अंकुश कडेकर याने दिली आहे.