नाशिक, 2 जुलै : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत (PMKVY) गरजू आणि होतकरू तरुणांसाठी केंद्र सरकार तर्फे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. जे विद्यार्थी प्रवेश शुल्क भरू शकत नाहीत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जात. या योजनेअंतर्गत नाशिक शहरातील उत्कर्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये 'इलेक्ट्रॉनिक्स कोर्स' (Electronics Course in Nashik) मोफत शिकविला जाणर आहे. तुम्हाला जर या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेलतर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
कुठे शिकविला जाणार हा कोर्स ?
सद्या प्रत्येक वस्तू ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये रूपांतरित झाली आहे. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शहरातील डी.जी.पी नगर येथील पाण्याच्या टाकी शेजारी, एकदंत कॉलनी प्लॉट नंबर 58, शिवांजली पेट्रोलपंप जवळ, उत्कर्ष ट्रेनिंग सेंटर अंबड, नाशिक या ठिकाणी हा कोर्स शिकवला जाणार आहे. अधिक माहितीसाठी 8888799200/ 8975659063 या नंबरवर संपर्क साधू शकता.
गुगल मॅपवरून साभार...
विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे ?
या प्रशिक्षणामध्ये 2 बॅच असणार आहेत. एका बॅचमध्ये 30 विद्यार्थी असतील. दुसऱ्या बॅचमध्येही 30 विद्यार्थी असणार आहेत. एकूण 60 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 18 ते 45 वयोगटातील सर्व जण या प्रशिक्षणासाठी पात्र असतील. या प्रशिक्षणाचा कालावधी हा 3 महिन्यांचा असणार आहे. दररोज 4 तास प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत?
1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
2) कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
3) स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
1) 8 वी, 10 वी, 12 वी, पदवी या पैकी कोणत्याही कागदपत्रांची झेरॉक्स 2 प्रत
2) आधारकार्ड झेरॉक्सची 2 प्रत
3) बँक पासबुक झेरॉक्सची 2 प्रत
4) पासपोर्ट साईज 2 फोटो
वाचा : महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य निश्चित, हैदराबादमध्ये ठरणार रणनीती
करिअरच्या संधी
इलेक्ट्रॉनिक्स कोर्स केल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी कामाची संधी मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल. तसेच आपण स्वतःचा देखील इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दुरुस्तीचा व्यवसाय सुरू करू शकता. पुढे जाऊन त्याच क्षेत्रात तुम्ही अधिक शिक्षण घेतलेतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण अभियंता पदावर देखील मजल मारू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Nashik