मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य निश्चित, हैदराबादमध्ये ठरणार रणनीती

महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य निश्चित, हैदराबादमध्ये ठरणार रणनीती

महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपने (BJP) पुढील लक्ष्य निश्चित केले आहे.

महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपने (BJP) पुढील लक्ष्य निश्चित केले आहे.

महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपने (BJP) पुढील लक्ष्य निश्चित केले आहे.

  मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ करून अखेर भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत आला आहे. भाजपने ‘मिशन लोटस’ हे महाराष्ट्रातही अगदी यशस्वीपणे राबवल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र काबीज केल्यानंतर आता भाजपने दाक्षिण भारतामधील (BJP in South India) राज्यांवर फोकस करण्याचं निश्चित केलं आहे.  भाजपाच्या याच रणनीतीचा भाग म्हणून तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये (Hyderabad) तब्बल 18 वर्षांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (BJP National Executive meet) आयोजित करण्यात आली आहे. आजपासून (शनिवार) या बैठकीला सुरुवात होईल. या दोन दिवसीय बैठकीमध्ये राज्यात भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

  पंतप्रधान करणार प्रचाराला सुरूवात

  ही कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर तीन जुलै रोजी एक मोठी सभा (PM Modi to visit Hyderabad) आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. या सभेला 35 हजारांहून अधिक कार्यालयांमधील भाजप कार्यकर्ते, आणि लाखो लोकांची उपस्थिती असणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून भाजपने तेलंगणामधील सर्व 119 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या नेत्यांना पाठवले आहे. तेथील स्थानिक परिस्थिती जाणून घेण्याचं काम या नेत्यांचं असणार आहे. सभेव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी (PM Modi in Hyderabad) या ठिकाणी एका भव्य रॅलीमध्येही सहभागी होतील. ही रॅली स्थानिक परंपरा आणि संस्कृती या विषयावर आधारित असेल.

  ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

  18 वर्षांनंतर कार्यकारिणीची बैठक

  तब्बल 18 वर्षांनंतर तेलंगणामध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (BJP National Executive) बैठक होत आहे. पक्षाशी संबंधित निर्णय घेणारी ही प्रमुख समिती आहे. हैदराबाद कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये देशभरातील सुमारे 350 सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या बैठकीला प्रत्येक सत्रामध्ये सहभागी असणार आहेत. तसेच, या बैठकीत दोन प्रस्ताव पारित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपचे महासचिव तरुण चुग यांनी दिली. या बैठकीच्या माध्यमातून 2024 च्या लोकसभा निवडणूक तसंच 2023 मध्ये होणारी तेलंगणाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा भाजपाकडून घेण्यात येईल.

  हायटेक सिटी भाजपच्या रंगात

  ही बैठक होत असलेले हैदराबाद कन्व्हेन्शन सेंटर हायटेक सिटीमध्ये (Hitech City) आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बॅनर आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व पोस्टर्स तेलंगणाची संस्कृती केंद्रस्थानी ठेऊन बनवण्यात आली आहेत. या पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. संजय कुमार यांचे फोटो आहेत. शहरातील प्रत्येक चौकात अशा प्रकारचे बॅनर, आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

  यासोबतच भाजपने या ठिकाणी एक प्रदर्शनदेखील उभारलं आहे. यामध्ये राज्यातील संस्कृती, हस्तकला, निजामांविरुद्धचा तेलंगणा मुक्ती संघर्ष आणि तेलंगणाला राज्याचा (Telangana State) दर्जा मिळावा यासाठी भाजपची भूमिका अशा गोष्टींचा समावेश आहे. यासोबतच निजामांनी केलेल्या अत्याचारांची माहिती देणारा एक विभाग या प्रदर्शनात उभारण्यात आला आहे.

  हैदराबादच्या भाजपा बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा, पक्षाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

  मुख्यमंत्री लक्ष्य

  दरम्यान, भाजप महासचिव तरुण चुग यांनी पत्रकार परिषदेमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर कडाडून टीका केली. 'केसीआर यांच्या सत्तेचे दिवस आता भरले आहेत, असं ते म्हणाले. केसीआर आपल्या 3000 दिवसांहून अधिकच्या कार्यकाळातील 30 तासदेखील कार्यालयात गेले नाहीत. पार्टी करणं, घराणेशाहीला चालना देणं याकडेच त्यांनी लक्ष दिलं. या राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या नागरिकांकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं,' अशी टीका चुग यांनी केली.

  एकूणच, भाजपने आता दाक्षिणात्य राज्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. याची सुरुवात तेलंगणापासून करण्यात आली आहे. हेच या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: BJP, Hyderabad