मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : महिलांनो, कॅन्सरकडं दुर्लक्ष करू नका, मोफत तपासणीचा घ्या फायदा

Nashik : महिलांनो, कॅन्सरकडं दुर्लक्ष करू नका, मोफत तपासणीचा घ्या फायदा

Nashik Women Cancer : एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी मोफत भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

Nashik Women Cancer : एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी मोफत भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

Nashik Women Cancer : एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी मोफत भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 19 जानेवारी : महिलांमध्ये आढळून येणारे कॅन्सरचे प्रमाण बघता उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी मोफत भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे गर्भाशय, स्तनांशी निगडीत महिलांना त्रास जाणवत असेल तर त्यांनी तात्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

कधी आणि कुठे आहे शिबीर?

येत्या 23 जानेवारीपासून या शिबिरास सुरुवात होणार असून 28 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी प्रतिबंधात्मक तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे. हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल नंदी हिल्स इगतपुरी तालुक्यातील धामणगाव आणि नाशिक शहरातील मुंबई नाका येथील एसएमबीटी क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात स्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटचा टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरसोबत गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक करार झाला आहे. यामुळे मोठ्या संख्येने तज्ञ डॉक्टर याठिकाणी उपलब्ध झाले असून अनेक जटील शस्रक्रिया एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये पार पडलेल्या आहेत. अद्ययावत आणि अत्याधुनिक साधनसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खर्चिक समजल्या जाणाऱ्या अनेक शस्रक्रिया कमीत कमी खर्चात होत आहेत. या शिबिरात स्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पॅप स्मीयर टेस्ट व स्तनांची सोनोग्राफी म्हणजेच मॅमोग्राफी केली जाणार आहे.

नाशिकमध्ये वाढला त्वचारोगाचा धोका, 'ही' लक्षणं आढळल्यास लगेच करा तपासणी, Video

भारतात दर एक लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण सांगण्यात येते. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता अधिकच वाढते. महिलांमध्ये गर्भाशयाचे व स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कर्करोगाचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर तो बरा होऊ शकतो. सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या आजारातून अनेक रुग्ण बरे होऊ लागले आहेत. कर्करोग त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो.

हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात असे तज्ञ सांगतात.

Wardha : पालकांनो, मुलांची काळजी घ्या! न्युमोनिया, डायरियाचा धोका वाढला

ही आहेत कर्करोगाची लक्षणे

अचानक रक्तपांढरे होणे, भूक मरणे, शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर रक्तस्राव होणे, स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे, आवाज बदलणे,  आवाज बसणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटणे, पोट जड वाटणे, न पचलेले अन्न उलटणे, तोंडात न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे, लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव, बध्दकोष्ठतेची तक्रार, काखेत, जांघेत, गळयात, कडक गाठींचे अवधाण येणे.

ही लक्षणे असलेल्या रुग्णांनी अधिक माहितीसाठी +91 91450 01630 क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव आणि नाशकातील एसएमबीटी क्लिनिकला अवश्य भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

First published:

Tags: Breast cancer, Cancer, Health, Local18, Nashik