नाशिक, 22 नोव्हेंबर: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अंबड याठिकाणी एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Student commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरती परीक्षेत (Fail in Police Recruitment Exam) अपयश आल्यानं संबंधित मुलानं आपल्या आयुष्याचा शेवट केला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. एवढ्या कमी वयात तरुणानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
राहुल भानुदास चौगुले असं आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो नाशिक जिल्ह्याच्या अंबड येथील एक्सलो पॉइंट परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहूल याने गेल्या आठवड्यात पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. अलीकडेच या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेत नापास झाल्याने त्याला नैराश्य आलं होतं. त्यामुळे गेले काही दिवस राहूल एकटं राहत होता. तसेच कोणाशीही जास्त बोलत नव्हता.
हेही वाचा-रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीला बसला हादरा अन्; छातीत गोळी घुसल्यानं जवानाचा अंत
दरम्यान, घटनेच्या दिवशी शनिवारी (20 नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास राहुलने विषारी औषध प्राशन केलं. विषारी औषध प्यायल्यानं राहुलला उलट्या आणि अन्य त्रास होऊ लागला. आपल्या मुलानं विष प्राशन केल्याची माहिती वडील भानुदास चौगुले यांना कळताच, त्यांनी त्वरित राहुलला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी डॉक्टरांनी राहुलला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
हेही वाचा-मामाच्या घरी राहणाऱ्या मुलीसोबत घडलं विपरीत; कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेली अन
पण विष संपूर्ण शरीरभर पसरल्याने रविवारी सकाळी राहुलचा दुर्दैवी अंत झाला आहे. राहुलच्या मृत्यूची बातमी ऐकून वडिलांना आणि नातेवाईकांना धक्काच बसली आहे. अवघ्या 22 व्या वर्षी तरुणानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik, Nashik suicide