हिंगोली, 22 नोव्हेंबर: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पमधील एका जवानाचा दुर्दैवी घटनेत मृत्यू (Soldier death) झाला आहे. एका कामानिमित्त गाडीतून प्रवास करत असताना, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे (Pits on road) गाडीला हादरा बसल्याने त्यांच्या हातातील बंदुकीतून गोळी सुटून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीला हादरा बसल्याने त्यांच्या बंदुकीतील गोळी थेट त्यांच्या छातीत घुसली आहे. जखमी अवस्थेतील जवानाला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आहे.
पप्पाला भानूप्रसाद असं मृत पावलेल्या 35 वर्षीय जवानाचं नाव आहे. ते मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी असून सध्या हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास मृत जवान पप्पाला भानूप्रसाद हे डिपार्टमेंटच्या गाडीतून हैदराबादहून नांदेडला रवाना झाले होते. याठिकाणी एका डॉक्टरला आणण्यासाठी ते चालले होते. पण कर्तव्यावर असताना एका विचित्र दुर्घटनेत त्यांचा अंत झाला आहे.
हेही वाचा-मैत्रिणीला भेटून येणाऱ्या तरुणावर पोलिसाने केला अनैसर्गिक अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल पप्पला भानूप्रसाद एका चालकाला घेऊन सरकारी वाहनातून नांदेडला जात होते. दरम्यान, डोंगरकडा ते नांदेड रस्त्याचं काम सुरू असल्याने संबंधित रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून मार्ग काढत गाडी पुढे जात असताना एका खड्ड्यात आदळल्याने जवानाच्या ‘इंसास रायफल’ मधून एक गोळी सुटली. ही गोळी थेट जवानाच्या छातीत घुसली आहे.
हेही वाचा-बीड: तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना लुटलं; भाऊचा कारनामा वाचून व्हाल हैराण
अचानक घडलेल्या या घटनेत पप्पला हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडताच वाहन चालकानं तातडीनं पप्पला यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारादरम्यान संबंधित जवानाचा मृत्यू झाला आहे. संबंधित जवानाचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news