मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai: मामाच्या घरी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत घडलं विपरीत; कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेली अन्...

Mumbai: मामाच्या घरी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत घडलं विपरीत; कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेली अन्...

Crime in Mumbai: मुंबईतील मुंब्रा परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका दुर्घटनेत 10 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Crime in Mumbai: मुंबईतील मुंब्रा परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका दुर्घटनेत 10 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Crime in Mumbai: मुंबईतील मुंब्रा परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका दुर्घटनेत 10 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) मुंब्रा (Mumbra) परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एक दहा वर्षांची मुलगी (10 years minor girl) घराच्या छतावर कपडे वाळत घालायला गेली असता तिला मृत्यूनं गाठलं आहे. अचानक समतोल बिघडल्यानं जमिनीवर पडून तिचा दुर्दैवी अंत (Fall down from terrace) झाला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी गेल्या काही काळापासून आपल्या मामाकडे वास्तव्याला होती.

मामाच्या घरी राहत असताना दुर्दैवी घटनेत छतावरून पडून तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मन्तसा खान असं मृत पावलेल्या 10 वर्षीय मुलीचं नाव आहे. ती मुंब्रा येथील कौसा परिसरातील सैनिक नगर परिसरात आपल्या मामाच्या घरी राहत होती.

हेही वाचा-दुर्देवी घटना; मुलाच्या जन्मदिनी केकवरील मेणबत्तीऐवजी आईची चिता जळाली

दरम्यान घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी इमारतीच्या छतावर कपडे वाळत घालायला गेली होती. यावेळी तिचा अचानक समतोल बिघडल्याने ती थेट जमिनीवर कोसळली आहे. या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा-बीड: तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना लुटलं; भाऊचा कारनामा वाचून व्हाल हैराण

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai