नाशिक 21 नोव्हेंबर : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मध्ये सत्यता असते. तर काही व्हिडिओ हे प्रसिध्दी मिळवण्यासाठी बनवलेले असतात. असाच एक व्हिडिओ नाशिक च्या ज्योती वाघ या महिलेचा व्हायरल झाला होता. त्यामध्ये ज्योती वाघ अगदी सहजरित्या उकळत्या तेलामधून तळलेले वडे हातानं काढत असल्याचं दिसत होत्या. यावरून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केले. मात्र, या मागचं खर कारण आहे जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीन ज्योती वाघ यांच्याकडून समजून घेतले तेव्हा त्यांच्या खऱ्या संघर्षाची कहाणी कळाली. ज्योती वाघ या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील जानोरी गावच्या रहिवाशी. मात्र, त्यांच्या नशिबी आलेला संघर्ष हा फार अवघड आहे. तरी त्यावर मात करत त्या आज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वतःच्या पायावर उभा राहून करत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीच निधन झालं आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली करायचं काय ? लहान दोन मुल,त्यांचा सांभाळ कसा करायचा,जगायचं कसं,अशा अनेक प्रश्नांनी त्यांना अक्षरशः सतावल होतं.
Nashik : झणझणीत मिसळसह खा भजे, नाशिकमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, Video
मात्र, त्यांच्यामध्ये जगण्याची अफाट जिद्द आणि धैर्य होत. या सर्व परिस्थितीवर मात करून लढायच त्यांनी ठरवलं. एका फुडस कंपनी मध्ये त्यांनी तुटपुंज्या पगारावर नोकरी सुरू केली. पण त्यावर काही कुटूंबाचा खर्च भागत नव्हता. त्याला जोड म्हणून त्यांनी काही हॉटेल मध्ये फरची पुसण्याच ही काम केले. पण हे सर्व करत असताना मुलांना वेळ देता येत नव्हता आणि तितक्या पैशावर भागत ही नव्हत. अशातच आईची तब्येत खराब झाली आणि काही दिवस सुट्ट्या घ्यावा लागल्या. पण त्यानंतर कंपनीने त्यांना कामावर येण्यास नकार दिला आणि पुन्हा काय करायचं असा प्रश्न उभा राहिला. नोकरी गेल्यानंतर सुरु केला वडापावचा स्टॉल नोकरी गेल्यानंतर त्यांनी ठरवलं आपण वडापावचा स्टॉल सुरु केला तर चालू शकतो. लगेच त्यांनी त्याची तयारी केली आणि अशोक मार्ग परिसरात विजय ममता टॉकीजच्या मागे नवदुर्गा फुड्स स्टॉल सुरु केला. अगोदर फार काही प्रतिसाद मिळत नव्हता. ग्राहक ही येत नव्हते,पण चांगल्या प्रकारचा वडापाव द्यायचा,साहित्य उत्तम वापरायचं अस मी ठरवल होत. हळूहळू ग्राहकांची आपोआप संख्या वाढली. पण सर्व एकटीने करायचं म्हटल्यावर खूप धावपळ होत होती. पण सर्व करताना माझी दोन मुल समोर दिसायची. त्यांचं शिक्षण त्यासाठी लागणारा खर्च समोर दिसायचा आणि पुन्हा जोमाने मी काम करायचे. गर्दी वाढल्यावर झाऱ्याने वडे काढण्यास जरा वेळ लागायचा. ग्राहक जास्त वेळ ताटकळत उभे राहायचे म्हणून चटका बसो की काही होवो मी पटकन हातानं वडे कढईतून काढून ग्राहकांना द्यायचे, असं ज्योती वाघ यांनी सांगितलं.
Nashik : भारीच! एकाच हॉटेलमध्ये मिळतात 13 प्रकारचे कढई पोहे, पाहा Video
आता हळूहळू मला सवय झाली आहे. मी जास्त झाऱ्याचा वापर करत नाही. हाताने काढून पटकन देते. यामागे माझा वेळ वाचवण हाच उद्देश आहे. कारण मला सर्व एकटीला करावं लागत. मुल शाळेत असतात. इतर लोकांना ते आकर्षण वाटत की मी हे असं का करत असेल. पण त्यांना माझी खरी कहाणी माहित नाही. जीवन जगण्यासाठी मी हा संघर्ष करत आहे.चटके सोसत आहे, असंही ज्योती सांगतात. त्यांची जिद्द अनेकाना प्रेरणादायी या ठिकाणचा वडापाव खूपच उत्कृष्ट आहे. चांगले पदार्थ त्या वापरतात. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी अनेकाना प्रेरणादायी आहे. असं खव्वये भागवत कांबळे सांगतात.
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे हा नवदुर्गा फुड्स स्टॉल नाशिक शहरातील अशोका मार्ग परिसरात विजय ममता टॉकीजच्या मागे हा नवदुर्गा फुड्स स्टॉल आहे. इथे चीज पाववडा, वडापाव,सँडविच,भजी,अगदी चविष्ट आणि अल्प दरात मिळतात.