जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिंता मिटली, मरायला मोकळा झालो! पाहा असे का म्हणाले दिव्यांग आजोबा? Video

चिंता मिटली, मरायला मोकळा झालो! पाहा असे का म्हणाले दिव्यांग आजोबा? Video

चिंता मिटली, मरायला मोकळा झालो! पाहा असे का म्हणाले दिव्यांग आजोबा? Video

जग सोडून गेल्यानंतरही आपल्या शरीराचा एखादा अवयव गरजूंच्या कामी यावा आणि त्यांना जीवदान मिळावे, यासाठी अवयवदान महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ Local18 ahmednagar,maharashtra
  • Last Updated :

    अहमदनगर, 23 नोव्हेंबर : जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येत असतोच. पण मृत्यूनंतरही तो उपयोगी पडू शकतो, हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. जग सोडून गेल्यानंतरही आपल्या शरीराचा एखादा अवयव गरजूंच्या कामी यावा आणि त्यांना जीवदान मिळावे, मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल, यासाठी नगर  जिल्ह्यातील जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान नागरिकांना देहदानाचे महत्त्व पटवून देत आहे. यातून शेकडो लोकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. आपलं मरण ही एखाद्याच्या कामी येऊ शकतं. मरणानंतरही आपण जिवंत राहू शकतो यासाठी आपल्याला एकच मार्ग आहे तो म्हणजे मरणोत्तर देहदानाचा. देहदानाचा संकल्प एखाद्या गरजू व्यक्तीचे जीवन बदलू शकते. देशभरात रोज अनेक अपघात होतात. यात काहींचा जणांचा मृत्यू होता तर काहीजण गंभीर जखमी होतात. यासाठी देहदान हे महत्त्वाचे मागले जात. मात्र, देहदानाबद्दल म्हणावी तेवढी जागृतता नाही. विदेशात अवयव दानाचे प्रमाण अधिक आहे. तुलनेत आपल्याकडे एक टक्काही नाही. Pune : पुणे शहरात रक्ताचा तुटवडा! पाहा का आली इतकी गंभीर वेळ, Video सपत्नीक देहदानाचा निर्णय जामखेड शहरात जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठान यांच्या वतीने देहदान संकल्प उपक्रम राबण्यात येत आहे. मरणोत्तर देहदान संकल्प अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात उस्मानाबाद येथील आश्रुबा मारुती मुंडे वय 75 आणि त्यांच्या पत्नी सरस्वती आश्रुबा मुंडे वय 70 या वयोवृद्ध दांपत्याने मरणोत्तर देहदान संकल्प केला आहे. आश्रुबा हे पायाने दिव्यांग आहेत. दिव्यांगाचे दु:ख जाणणाऱ्या आश्रुबांना वाटते की, आपल्यासारख्या यातना कोणालाही भोगाव्या लागू नयेत. यासाठी मरणोत्तर देहदान आवश्यक आहे. आपल्यामुळे कोणी चालू शकेल, कोणी पाहू शकेल. यामुळे सपत्नीक मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.   चिंता मिटली आश्रुबा हे पूर्वी वाहन चालक म्हणून काम करत होते. मुलं बाळ नसल्यामुळे ते व्याकूळ होते. देहदानाबद्दल त्यांना माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी देहदानाचा फॉर्म भरला. आपल्या मरणानंतर आपला विधी करण्यासाठी कोणीही नाही म्हणून चिंतेत होतो. मात्र आता चिंता नाही मरणोत्तर देहदान करणार असल्याचे आश्रुबा सांगतात. दरम्यान, मरणोत्तर देहदानाचा फॉर्म दाखल करून घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. आतापर्यंत जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान मार्फत एकूण 466 लोकांचे देहदान, अवयवदान फॉर्म भरलेले आहेत. त्यापैकी 10 जणांचे देहदान झाले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात