मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'महिलांना कोणी नाकारु शकत नाही', चित्रा वाघ मंत्री होणार?

'महिलांना कोणी नाकारु शकत नाही', चित्रा वाघ मंत्री होणार?

भाजप नेत्या चित्रा वाघ

भाजप नेत्या चित्रा वाघ

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. याबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं.

  • Published by:  Chetan Patil
नाशिक, 8 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होवून आता जवळपास दोन महिने होत आली आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला आहे. पण दुसऱ्या टप्प्याचा विस्तार अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा निकाल मुख्य शिवसेनेच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष पुन्हा तीव्र होऊ शकतो. निकाल कधी येईल याबाबत अनिश्चितता आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तारही कधी होईल याबाबत स्पष्ट अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या टप्प्यात कुणाकुणाला संधी मिळेल, याबाबतही माहिती समोर आलेली नाही. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळेल का? असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांना विचारला तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. याबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं. महिलांना कोणी नाकारु शकत नाही. 50 टक्के महिला जनशक्ती आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला तुम्हाला मंत्री म्हणून दिसतील, असं सूचक विधान चित्रा वाघ यांनी केलं. तसेच "पक्षाचं हातात असतं कुणाला मंत्री करायचं, आम्ही कार्यकर्ते आहोत आणि काम करत राहू", असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्या. (शिंदे राहिले बाजूला, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश) नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावरुन आज पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातील 6 मुलांना मेंढपाळाचे काम करायला लावले. याच कामादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला, अशी धक्कादायक बाब उघड झालीय. गेल्या तीन वर्षांपासून नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील मुलांना आई-वडील वर्षाचे पैसे घेऊन हे काम करण्यासाठी पाठवत आहेत. या तीनही जिल्ह्यातील जवळपास 30 लहान मुलांना या कामासाठी एका एजेंटच्या मध्यामतून विक्री करण्यात आली होती", असा दावा चित्रा वाघ यांनी केला. "नाशिक आणि नगर पोलीस या संदर्भात चौकशी करत आहेत आणि यात काही जणांना ताब्यात देखील घेतले आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. अशा लहान मुलांना वेटबिगाराचं काम लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल", अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. "बारामती काय राज्याबाहेर नाहीय. त्यामुळे भाजपकडे असलेले सगळेच लोकसभा मतदारसंघावर आम्ही काम करत आहोत. अमेटीवालेपण बोलत होते अमेटी जिंकणं सोप नाही. त्यामुळे अशक्य असं काहीच नाही, अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. राजकारणाबद्दल कोणीच काही आडाखे बांधू नये. कारण राजकारण कधी काय होईल हे सांगत येत नाही त्याचा प्रत्यय आपण आता घेत आहोत", अशीदेखील प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
First published:

Tags: BJP, Chitra wagh

पुढील बातम्या