नागपूर, 8 सप्टेंबर : उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 40 आमदार, 10 अपक्ष आणि 12 खासदार आले, याशिवाय शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला. आता मात्र उद्धव ठाकरेंकडे असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखाने एकनाथ शिंदेंकडे न जाता थेट भाजपचा रस्ता धरला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमरावती जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राजेश वानखेडे यांच्यासह अमरावती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. युतीमध्ये भाजपचं ‘कल्याण’, मग श्रीकांत शिंदेंना काय? मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया अमरावतीचा वाद काहीच दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये केलेल्या वक्तव्यावरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडली होती. अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपचा असेल, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते आनंदराव अडसूळ नाराज झाले होते. राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयम ठेवून बोलावे. अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, त्यामुळे आमदार आणि खासदार भाजपचा म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सोबत आहोत याचं भान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठेवावं, असं आनंदराव अडसूळ म्हणाले, तसंच बावनकुळे यांच्या वक्तव्याची आपण फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.