मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : एक हात नाही पण जिद्द दुप्पट, 4 जणांचा संसार चालवणाऱ्या लढवय्याची प्रेरणादायी गोष्ट, Video

Nashik : एक हात नाही पण जिद्द दुप्पट, 4 जणांचा संसार चालवणाऱ्या लढवय्याची प्रेरणादायी गोष्ट, Video

Nashik : नाशिकमधील चंद्रकांत गुजरे हे जन्मतः उजव्या हाताने दिव्यांग आहेत. त्यानंतरही त्यांच्या जिद्दीचा प्रवास पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 27 सप्टेंबर : आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट कमी पडली किंवा मिळाली नाही. अथवा आपल्या शरीराने साथ दिली नाही,आपल्या शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तर आपण नैराश्यात जातो. जणू आता जीवनात काहीच शिल्लक राहील नाही असा समज करून बसतो. नैराश्यातून अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलत असतात. मात्र, नाशिकमधील चंद्रकांत गुजरे हे सर्वांसाठीच आदर्श आहेत. चंद्रकांत हे जन्मतः उजव्या हाताने दिव्यांग आहेत. हाताला आलेल्या दिव्यांगत्वाला घाबरून न जाता ते चप्पल बूट शिवण्याचे काम करत आहेत.

चंद्रकांत यांच्या हाताच्या बोटांच्या नसा फुगलेल्या आहेत. त्यांची इतकी वाढ झाली आहे की त्यांचा हात निकामी झाला आहे. त्यातील फक्त दोन बोटं ठीक आहेत. पण अशा परिस्थितीतही चंद्रकांत हतबल झाले नाहीत की डगमगले नाहीत. ते चप्पल बूट शिवण्याचे काम करून आपल्या कटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

हेही वाचा : Nashik : गोदावरीच्या काठावर साकारलंय भव्य स्वामीनारायण मंदिर, बुधवारी होणार मुख्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, Video

'सहावीत शिकत असताना घरची सर्व जबाबदारी पडली' 

सहावीत शिकत असताना चंद्रकांत यांचं पितृछत्र हरपलं आणि घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली अशा परिस्थितीत करायचं काय ? आपल्या हाताला दिव्यांगत  आलं. वडिलांचं निधन झाल्यामुळे घरात कमावणारा कोणी नाही. उदरनिर्वाह कसा करायचा अशा असंख्य प्रश्नांनी त्यांना हैराण केले होते अखेर चंद्रकांत यांनी सहावीत शिकत असतानाच चप्पल बूट शिवण्याचे काम सुरू केले.

हात साथ देत नव्हता मात्र उजवा हात गेला म्हणून काय झालं डावा हात आणि दोन पाय तर शाबुद आहेत ना या विचारानेच त्यांनी काम सुरूच ठेवलं. चप्पल बूट शिवून आपल्या कुटुंबातील 4 व्यक्तीचा उदरनिर्वाह ते करत आहेत. गेली 45 वर्षांपासून ते हे काम करतायत. काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणतही नैराश्य दिसत नाही.अगदी उत्साहीत पणे ते काम करत आहेत.

हेही वाचा :  Satara: भूसंपादन न करताच महामार्ग तयार, जमिनीचा मोबदला कधी मिळणार? Video

'हिम्मत हारली असती तर जगू देखील शकलो नसतो'

चंद्रकांत गुजरे सांगतात की, काम करा, हिम्मत हारू नका,यश अपयश हे येतच असत, म्हणून काय नैराश्यात जायचं नसते. मी जर हिम्मत हारली असती तर जगू देखील शकलो नसतो पण आज मी माझ काम जोमाने करत आहे. देवाने जी गोष्ट कमी दिली आहे ना तीच आपली खरी ताकद आहे.

'काही लोक जाणूनबुजून त्रास देतात'

चंद्रकांत गेली 45 वर्षांपासून रविवार कारंजा परिसरात चप्पल बुट शिवण्याचे छोटेसे दुकान चालवतात. पण त्यांना इथही काही लोक त्रास देतात अशी खंत ही चंद्रकांत यांनी यावेळी बोलून दाखवली.

First published:

Tags: Nashik