मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara: भूसंपादन न करताच महामार्ग तयार, जमिनीचा मोबदला कधी मिळणार? Video

Satara: भूसंपादन न करताच महामार्ग तयार, जमिनीचा मोबदला कधी मिळणार? Video

सातारा- लातूर हा रस्ता अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. भूसंपादन कधी होणार? त्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

सातारा- लातूर हा रस्ता अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. भूसंपादन कधी होणार? त्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

सातारा- लातूर हा रस्ता अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. भूसंपादन कधी होणार? त्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा,  27 सप्टेंबर : सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. आता सातारा- लातूर हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार केला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यातून हा रस्ता जातो. मात्र, अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. त्यामुळे भूसंपादन कधी होणार, त्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी करीत आहेत. 

किरकोळ गटाचे भूसंपादन 

रस्त्यासाठी अत्यल्प भूसंपादन करावे लागले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. काही किरकोळ गटाचे भूसंपादन करून शेतकरी वर्गाला याची कल्पना ही देण्यात आली नाही. काही लोकांनी आवाज उठवला असता. दुसऱ्या वेळी निवेदा काढून भूसंपादन करण्यात आले, तर काही ठिकाणी नागरिकांना या वरती कोर्टात धाव घेतली असल्याचे शेतकरी सांगतात.

लोकांना कल्पनाच नाही

हे सगळं होत असताना सर्वसामान्य लोकांना याची पुसटशी ही कल्पना देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदार यांनी दंडिलशाहीने रस्ता करून घेतला. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. याकडे शासन लक्ष देणार का, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video

सातारा-पंढरपूर राज्य रस्त्याची वाहतूक व गरज लक्षात घेऊन या रस्त्याला महामार्गाचा दर्जा जानेवारी 2017 मध्ये देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता दुपदरी कॉंक्रिटी आणि कडेला शोल्डर असा आहे. रस्त्याची एकूण रुंदी 14 मीटर व मुख्य दुपदरी रस्ता हा 10 मीटर आहे. तर दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 मीटर अंतराचे शोल्डर म्हणजेच मुरमी रस्ता तयार करण्यात आला आहे.

वृक्षारोपण झालेले नाही

सातारा- लातूर राज्य रस्त्याला महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी पूल तसेच भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे काम रखडले आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाले तोडण्यात आली आहेत. दरम्यान रस्त्याच्या कामात जितकी झाडे तुटणार आहेत. त्याच्या चौपट झाडांचे रोपण करून ती जगवणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी. एस. आवटे यांनी दिली होती. मात्र आजपर्यंत येथे वृक्षारोपण झालेले नाहीये.

First published:

Tags: Satara, Satara news, सातारा