नाशिक, 27 सप्टेंबर : मंदिरांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये आणखी एक भव्य मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून या मंदिराचे काम सुरू होते. मध्यंतरी कोरोना काळात काही दिवस काम थांबण्यात आले होते. 23 सप्टेंबरपासून मंदिराती मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवास सुरुवात झाली आहे. या उत्सवामध्ये सोमवारी (26 सप्टेंबर) विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त ब्रम्हस्वरूप महंत स्वामींचे आगमन नाशिकमध्ये झाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंदिर परिसरासह शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
तपोवन केवडीबन येथे उभारण्यात आलेल महाकाय स्वामी नारायण मंदिर बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘महोत्सवातील मुख्य वेदोक्त मूर्ती प्रतिष्ठाविधीचे बुधवार (28 सप्टेंबर) रोजी आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घ्यावा,’ असं आवाहन भक्तीप्रियदास कोठारी स्वामी यांनी केले आहे.
हजारो भाविकांची उपस्थिती
स्वामीनारायण मंदिरात दहा दिवस साजरा होत असलेल्या या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात नाशिक गुजरात मुंबई पुणे खानदेशासह देश विदेशातून लाखो हरी भक्त उपस्थित आहेत. सर्व कार्यक्रमाची आखणी शिस्तबद्ध आणि नियमानुसार व्हावी यासाठी जवळपास एक हजार स्वयंसेवक भक्तीच्या भावनेनं सेवा देत आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिसलं सप्तश्रृंगी देवीचं मूळ मनोहर रूप, Video
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 350 सून अधिक संत हा यामध्ये सहभागी झाले आहेत भाविकांसाठी भोजन, निवासासह आवश्यकतेनुसार औषधोपचार ही सोयीनुसार स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट कडून करण्यात आले आहेत.
गुगल मॅपवरून साभार
स्वामी नारायण मंदिराचा पत्ता
BAPS श्री स्वामी नारायण मंदिर, पंचवटी, नाशिक तपोवन केवडीबन, पिन कोड : 422003
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.