नाशिक 29 डिसेंबर : नाशिकमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात एका अपघातग्रस्त कारमध्ये असं काही आढळलं, जे पाहून पोलीसही थक्क झाले. नाशिकच्या उंटवाडी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कारने तीन वाहनांना धडक दिली होती. या वाहनात पैशांची बॅग आढळून आली आहे. नाशिक : वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी तीन वाहनांना धडक देणाऱ्या अपघातग्रस्त वाहनात कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. यानंतर ही कार अंबड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली. दरम्यान तपासणीदरम्यान या कारमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली. कारच्या मागील सीटवर बॅगमध्ये ही रक्कम दिसली. यात 500 आणि 2 हजार रूपयांच्या अनेक नोटा असल्याचं सांगितलं जात आहे. ही रक्कम नेमकी किती आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, अपघातग्रस्त कारमध्ये इतकी मोठी रक्कम सापडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Nashik : शेततळ्याजवळ गेला अन् जीवाला मुकला, नीट जगही न पाहिलेल्या नाशिकच्या चिमुकल्या देवांशवर काळाचा घाला पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह गाडी पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आली. आता ही रोकड कुठून आली? ती कुणाची आहे ? या विषयी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान अपघात झाला त्यावेळी या गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही समोर येत आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. यासोबतच गाडीमध्ये सापडलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या, हेदेखील तपासलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.