मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : अंध असूनही इतरांना करतात मदत, आजवरचा प्रवास वाचून वाटेल अभिमान

Nashik : अंध असूनही इतरांना करतात मदत, आजवरचा प्रवास वाचून वाटेल अभिमान

अरुण भारस्कर (Arun Bharaskar) हे स्वतः अंध असून इतर अंध बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली.

अरुण भारस्कर (Arun Bharaskar) हे स्वतः अंध असून इतर अंध बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली.

अरुण भारस्कर (Arun Bharaskar) हे स्वतः अंध असून इतर अंध बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली.

नाशिक 20 ऑगस्ट ; इतरांना मदत करण्याची आपल्या मनात जर दृढ इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत मदत करू शकतो. हे नाशिकच्या अरुण भारस्कर (Arun Bharaskar) या अंध ( Blind ) व्यक्तीने दाखवून दिलं आहे. त्यांचा मदतीचा ध्यास हा डोळस असणाऱ्यांना देखील लाजवणारा आहे. कारण ते स्वतः अंध असतानाही आपल्या इतर अंध बांधवांना मदत कशी मिळवून देता येईल. यासाठी ते दिवसरात्र झगडत आहेत.

अरुण भारस्कर हे मूळचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगावचे रहिवासी नोकरी निमित्त ते गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरात राहतात. त्यांना काहीही दिसत नाही. जन्मतः ते अंध आहेत. मात्र स्वतः अंध असतानाही आपल्या इतर अंध बांधवांना मदत कशी मिळवून देता येईल यासाठी ते दिवसरात्र झगडत असतात. 2006 साली त्यांनी द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली. संस्था स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश एकच होता की अंध नागरिकांना मदत मिळवून देणे. आजपर्यंत त्यांनी शेकडो अंध नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या सेवा कार्यात इतर नागरिकांनी देखील मदत केली. अंध व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. प्रत्येक अंध व्यक्ती जर शिकला तर त्याला फायदा होईल, नोकरी मिळेल आणि तो त्याचा उदरनिर्वाह भागू शकेल हाच ध्यास लक्षात घेता ते काम करत आहेत.

हेही वाचा : Nashik : श्रीरामांनी वास्तव्य केलेल्या नाशिक शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? VIDEO

विविध उपक्रमांच्या माध्यमातून अंधांना मदत

कोरोना काळात अनेक अंध व्यक्तींना आपला उदरनिर्वाह भागवणे कठीण झाले होते. तेव्हा अरुण भारस्कर यांनी विविध संस्थांची मदत घेऊन गरजू अंध व्यक्तींना वेळोवेळी किराणा वाटप केला होता. तसेच दैनंदिन वस्तू देखील मिळवून दिल्या होत्या. शिष्यवृत्ती योजना, अंधानकरिता स्वयंरोजगार शैक्षणिक साहित्याची निर्मिती, क्रीडा स्पर्धा, विवाहसोहळा, अंधत्व निर्मूलन शिष्यवृत्ती योजनेत साधारण 1840 विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देता आला आहे. स्वयंरोजगार योजना अंतर्गत 129 अंध व्यक्तींचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्यात आले.

शैक्षणिक साहित्य उपक्रमाअंतर्गत दहावीचे ब्रेल लिपित गाइड प्रथम छापले यामुळे अंध विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडथळा निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढेल तसेच अंध व्यक्तींना धार्मिक वाचन करता येण्यासाठी ज्ञानेश्वरी देखील ब्रेल लिपीत छापण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले होते.

संस्थेचा पत्ता

सुयोजित रतन मॉल, तिसरा मजला, नेहरू गार्डन समोर, हा संस्थेचा पत्ता आहे. अधिक माहितीसाठी 919822900717 या नंबरवर संपर्क साधू शकता.

हेही वाचा : Nashik: नोकरी मिळाली नाही म्हणून सुरू केला व्यवसाय; विद्यार्थ्यांची सुटली अडचण, VIDEO

अंध बांधवांवर ही वेळ नको म्हणून प्रयत्न 

मी अंध असल्यामुळे मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला बरेच हाल सोसावे लागले. शैक्षणिकदृष्टया ही अनेक संकटांचा सामना करावा लागला अंध व्यक्तींना खूप त्रासातून जावे लागते आणि ही सर्व परिस्थिती मी भोगली आहे. त्यामुळे माझ्या इतर अंध बांधवांना हे भोगावं लागू नये याकरिता माझी धडपड आहे. संस्थेच्या माध्यमातून मी मदत मिळवून देण्यासाठी काम करतो. या मदतीत इतर चांगल्या लोकांचा देखील सहभाग असतो. त्यामुळे वेळोवेळी सर्व गोष्टी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, असे अरुण भारस्कर यांनी local18 शी बोलताना सांगितले.

कार्य बघून आम्हाला खूप आनंद वाटतो 

अरुणचे हे कार्य बघून आम्हाला खूप आनंद वाटतो तो स्वतः अंध आहे तरी इतरांना मदत करण्यासाठी तो सतत धडपडत असतो. अहोरात्र मेहनत घेतो अनेक अंध बांधवांना त्याने मदत मिळवून दिली आहे. कोरोना काळात काही अंध व्यक्तींना उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते अशा लोकांना अरुणने किराणा दिला अनेक संस्थाना त्याने मदतीचे आवाहन केले. मदत कोणतीही असो अरुण पुढेच असतो. अंध बांधवांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. संगीत क्षेत्रात त्याला आवड आहे. त्यामुळे तो अनेक अंध बांधवांना संगीताचे धडे देतो. अरुणला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असेच कार्य समाजासाठी त्याच्या हातून घडत राहो, अशी प्रतिक्रिया कारभारी बागुल या अंध मित्राने local18 शी बोलताना दिली आहे.

First published:

Tags: Nashik