मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik: नोकरी मिळाली नाही म्हणून सुरू केला व्यवसाय; विद्यार्थ्यांची सुटली अडचण, VIDEO

Nashik: नोकरी मिळाली नाही म्हणून सुरू केला व्यवसाय; विद्यार्थ्यांची सुटली अडचण, VIDEO

X
राज्य

राज्य सेवा परीक्षेत (MPSC) अपयश आल्यामुळे खचून न जाता विशाल खानकरी (Vishal Khankari) या तरुणाने स्वतःचा घरगुती जेवणाचा (मेस) व्यवसाय सुरु केला आहे.

राज्य सेवा परीक्षेत (MPSC) अपयश आल्यामुळे खचून न जाता विशाल खानकरी (Vishal Khankari) या तरुणाने स्वतःचा घरगुती जेवणाचा (मेस) व्यवसाय सुरु केला आहे.

नाशिक 15 ऑगस्ट ; नोकरी लागत नाही म्हणून अनेक जण नैराश्यात जातात. नोकरी लागली तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे प्रत्येकाला वाटते. मात्र, आपण एखादा चांगला व्यवसाय करून देखील आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. चांगल जीवन जगू शकतो. याचच उदाहरण म्हणजे नाशिकच्या सिडको परिसरात ( Cidco In Nashik ) राहणारा विशाल खानकरी (Vishal Khankari) हा तरुण. या तरुणाने राज्य सेवा परीक्षेत (MPSC) अपयश आल्यामुळे खचून न जाता स्वतःचा घरगुती जेवणाचा (मेस) व्यवसाय सुरु केला असून महिन्याकाठी 50 ते 60 हजारांचा नफा मिळत आहे.

विशाल खानकरी हा मूळचा सटाणा तालुक्यातील मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो आई वडिलांसोबत नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. विशालचं लहानपणापासून स्वप्न होत की नोकरी करायची त्यामुळे तो शिक्षण घेत होता. त्याच बीए पर्यंतच शिक्षण पूर्ण झालं इतर अनेक लहान मोठे कोर्स ही त्याने पूर्ण केले मध्यंतरी त्याने राज्य सेवा परीक्षेची  तयारी केली. मात्र त्यातही यश काही आल नाही. पण यश मिळत नाही म्हणून डगमगून न जाता विशालने घरगुती जेवणाचा (मेस) आईच्या मायेचा डब्बा सुरू केला. व्यवसायात आपण आपल करियर करू शकतो म्हणून त्याने व्यवसाय सुरू केला. त्याला अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत त्याने हा व्यवसाय चांगला यशस्वी केला असून यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे जेवण मिळत असून विद्यार्थ्यांची जेवणाचीही अडचण दूर झाली आहे. आता शिक्षण संभाळत तो हा व्यवसाय करतो आहे.

हेही वाचा : Pune : 144 वर्षांच्या लज्जतदार चवीची अखंड परंपरा, 4 पिढ्यांनी जपलं पुणेकरांशी नातं, VIDEO

अशी सुचली व्यवसायची कल्पना 

विशाल सांगतो की या व्यवसायाची कल्पना सुचण्यामागचे कारण म्हणजे महाविद्यालयीन काळात शिक्षण घेत असताना मेस लावली होती. मात्र ते जेवण चांगल मिळत नव्हत आईच्या हातची चव त्या जेवणाला नव्हती. त्यामुळे आपण सुरू केलेल्या मेस मध्ये विद्यार्थ्यांना जेवण करताना आईच्या मायेची आठवण यावी त्यांना चांगले जेवण मिळावं. ही त्यामागची कल्पना होती.

कुठे आहे आईच्या मायेचा डब्बा

अंबड पोलीस स्टेशन रोड, मयुर फोटो स्टुडिओच्या शेजारी, गणेश चौक, सिडको नाशिक या पत्त्यावर डब्बा मिळेल.  8208247948 या नंबरवर संपर्क करून तुम्ही डब्बा मागवू शकता. 60 रुपयांना एकावेळेचा डब्बा तुम्हाला मिळेल सकाळ सायंकाळ दोन्ही वेळेस जर घेतला तर 120 रुपये लागतील. त्यात तुम्हाला चार पोळ्या, भाजी, डाळ भात, ठेचा, लोंच मिळेल.

काम करणाऱ्या महिला म्हणतात इतर मुलांनी देखील विशालचा आदर्श घ्यावा

व्यवसायात अडचणी येत असतात. त्यावर मात कशी करायची हे शिकल पाहिजे. विशालने नोकरी लागली नाही म्हणून हतबल न होता हा व्यवसाय सुरू केला. आज त्याला चांगला फायदा होतो आहे. अनेक तरुण नोकरी लागली नाही तर जीवन संपवतात. जर असा व्यवसाय केला तर आपण जीवन चांगल जगू शकतो. त्यामुळे मेहनत करण्याची जिद्द ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल. आज आम्हाला दोन महिलांना त्याने रोजगार दिला मात्र पुढे जाऊन तो अनेक महिलांना रोजगार देईल त्याची मेहनत करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे, अशी प्रतिक्रिया भारती आहेर यांनी दिली आहे.

हेही वाचा : Wardha : यंदा सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस: सर्वच जलाशय ओव्हरफ्लो, VIDEO

मेहनत केली की यश मिळत

आपण जर मेहनत करण्याची तयारी दाखवली तर यश आपोआप मिळत. थोडा उशीर लागतो पण एक दिवस यश मिळत. विशाल लहानपणापासून हुशार आहे. नोकरी लागत नाही म्हणून तो कधीच नैराश्यात गेला नाही किंवा हतबल होऊन बसला नाही. त्याने मेसचा व्यवसाय सुरू केला. आज त्याला चांगला फायदा होतो आहे. असच करत राहिला तर अजून पुढे जाईल, अशी प्रतिक्रिया विशालचे वडील राजेंद्र खानकरी यांनी दिली आहे.

तो लहानपणापासून खूप मेहनती आहे. त्याला सतत काही तरी करण्याची इच्छा असते. त्याने हा व्यवसाय सुरू केला. त्याच्या मेहनतीवर सर्व तो करतो अशी प्रतिक्रिया विशालची आई संगीता खानकरी यांनी दिली आहे.

First published:

Tags: Business, Nashik