जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यातील पहिल्या पक्षीघराची दुरवस्था, पाहा कोण आहे कारणीभूत Video  

राज्यातील पहिल्या पक्षीघराची दुरवस्था, पाहा कोण आहे कारणीभूत Video  

राज्यातील पहिल्या पक्षीघराची दुरवस्था, पाहा कोण आहे कारणीभूत Video   

नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या पक्षी घराची एकाच वर्षात दुरवस्था झाली आहे.

  • -MIN READ Local18 Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक,10  डिसेंबर : गुजरात राज्यातील मेहेसाना जिल्ह्यात असलेल्या पक्षीघराच्या धर्तीवर नाशिक मध्ये उभारण्यात आलेल्या पक्षीघराची एकाच वर्षात महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दुरवस्था झाली आहे. राज्यातील पहिले पक्षीघर म्हणून तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र अवघे काही दिवस पक्षांना तिथं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून दाना पाणी दिलं गेलं. त्यानंतर हे पक्षीघर ओसाड पडले आहे. याला जबाबदार महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पक्षीघरासाठी 14 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. पक्षीघर उभारण्याचा मुळ उद्देश होता तो पक्षी वाचवणे. त्यांना दाना पाणी देणे,जेणेकरून पक्षांचा सहवास परिसरात जास्त राहील. मात्र तस काहीच होत नाही आहे. पक्षांना पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या कुंड्यांमध्ये शेवाळ जमा झाले आहे. ज्या ठिकाणी दाने टाकतात. त्या ठिकाणी उंदीरानी येऊन घान केली आहे. कचरा मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्यामुळे याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. Nashik: पार्किंगचा पत्ता नाही पण टोईंगचा धडाका, अजब कारभारानं नाशिककर वेठीस पक्षीघरच चुकीच्या ठिकाणी उभारले पक्षांचा सहवास हा ज्या परिसरात शांतता आहे कमी रहदारी आहे. त्या भागात जास्त लाभतो कारण ते तिथं राहणं जास्त पसंत करतात. गर्दीत किंवा गोंगाटात पक्षी राहत नाहीत. नाशिक शहरात उभारण्यात आलेले हे पक्षीघर पंचवटीतील परशराम पुरिया पार्क येथे बांधण्यात आले आहे. या परिसरात चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. कारण शहरातील मुख्य चौक आहे. दररोज हजारो वाहन,नागरिक त्यांचा वावर या परिसरात असतो. त्यामुळे साहजिकच गाड्यांच्या हॉर्नचा कर्कश आवाज मोठ्या प्रमाणात असतो. हे बघता पक्षी कसे या ठिकाणी येऊ शकतील आणि त्या घरात राहतील हा विषय आहे. मात्र याची शाहनिशा न करता तिथेच हे पक्षीघर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात आहे. याला महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे, असा आरोप नागरिक स्वप्नील येवले यांनी केला आहे तसेच कचरा हटवून पक्षांना दाना पाणी ठेवावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

    मुजोर रिक्षाचालकांपासून कधी सुटका होणार? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नाशिककर त्रस्त

    दाना पाणी करण्याची जबाबदारी आमची नाही पक्षी घराच्या दुरवस्थे संदर्भात आम्ही महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील अधिकारी निकम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्षांना दाना पाणी देणं काम आमचं नाही. एका संस्थेचे कार्यकर्ते तिथे पक्षांना दाने टाकतात. पाणी ठेवतात अस त्यांनी सांगितलं. मात्र प्रत्येक्षात तस होताना दिसत नाही आहे. महापालिकेच्या खर्चातून बांधलेल्या पक्षीघराची जबाबदारी महापालिका घेत नाही मग नेमक कोण घेणार? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात