मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिंचन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, माजी जलसंपदा अभियंत्याचा मोठा आरोप, अजित पवार अडचणीत येणार?

सिंचन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, माजी जलसंपदा अभियंत्याचा मोठा आरोप, अजित पवार अडचणीत येणार?

अजित पवार (फाईल फोटो)

अजित पवार (फाईल फोटो)

भाजपचे नेते मोहित कंभोज यांनी केलेलं ट्विट महत्वाचं आहे. सिंचन घोटाळ्याची मागील 10 वर्षात काहीही चौकशी झाली नाही. सिंचन घोटाळाप्रकरणी फक्त कारवाईचे नाटक करण्यात आले.

  • Published by:  News18 Desk
नाशिक, 19 ऑगस्ट : सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना क्लीन चीट मिळाली नसल्याचं समोर येत असतानाच मोहित कंबोज यांनी केलेल्या काही ट्विटमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या याच सिंचन घोटाळा प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. या प्रकरणी एका माजी अधिकाऱ्याने मोठा आरोप केला आहे. हा मोठा आरोप काय - भाजपचे नेते मोहित कंभोज यांनी केलेलं ट्विट महत्वाचं आहे. सिंचन घोटाळ्याची मागील 10 वर्षात काहीही चौकशी झाली नाही. सिंचन घोटाळाप्रकरणी फक्त कारवाईचे नाटक करण्यात आले. सिंचन घोटाळा प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. सिंचन घोटाळा उघड करणारे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती. मात्र, खंडपीठाने ती अद्यापही मान्य केलेली नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यापेक्षा सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. तसेच चितळे समितीने सर्व गोष्टी अहवालात नमूद केले आहे, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या पाठोपाठ विजय पांढरे यांची या प्रकरणात एन्ट्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर मोहित कंबोज यांचा आरोप, रोहित पवारांचा पलटवार! कंबोज यांचं ट्विट काय -  राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कंबोज यांनी केलेल्या काही ट्वीटमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटेल, असं ट्वीट कंबोज यांनी केलं होतं. तसंच सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी, ज्याची फाईल परमबिर सिंग यांनी 2019 साली बंद केली होती, असंही कंबोज म्हणाले.
First published:

Tags: Ajit pawar, Scam

पुढील बातम्या