नाशिक, 20 फेब्रुवारी लक्ष्मण घाटोळ : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुताळा- भुताळीन ठरवून एका वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमूस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील ही घटना आहे. घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यता आली आहे. भावाच्या मृत्यूचा आरोप घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातल्या कळमूस्तेच्या पिंपळाचा पाडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्यास भुताळा आणि भुताळीन ठरवून जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी झालं आहे. हे वृद्ध दाम्पत्य सख्खा मोठ्या भावाच्या मृत्यूला जबाबदार आहे. त्यांनी जादूटोणा केल्यामुळेच वृद्धाच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला, असा आरोप या वृद्ध दाम्पत्यावर करण्यात आला होता. यातूनच भावकीतील लोक आणि नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली. या घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी झालं आहे. हेही वाचा : ..अन् मुंबई पोलीस बनले सिम कार्ड सेल्समन; आरोपीला राजस्थानमधून अटक ‘अनिस’चा पाठपुरावा दरम्यान या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरसूल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जादूटोणा प्रतिबंधचे कलम लावण्यात यावे अशी मागणी अनिसकडून करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.