नाशिक, 30 मार्च : राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम राहिला नाही. एकीकडे शिवसेना फोडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदासाठी कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून आहे. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर भरसभेत छळकले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खुद्द अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थितीत आहे. पण, या मेळाव्यात उत्साही कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अजित पवार असं बॅनरच लावून एकच धुरळा उडवून दिला.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवार भावी मुख्यमंत्री असा पोस्टर लावण्यात आलं होतं. याआधी मुंबईत जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असे पोस्टरही लावण्यात आले होतं, यानंतर आता अजित पवारांसाठीचे पोस्टर लावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होतं.
पण, 'काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, असं अजित पवार म्हणाले. असे पोस्टर लागले असतील तर त्याला मनावर घेऊ नका, फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. हे फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान असतं, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar