जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : नाशिकमध्ये बड्या अधिकऱ्यावर तोंड लपविण्याची नामुष्की, ACB अधिकाऱ्यांनी रंगेहाथ आवळल्या मुसक्या

VIDEO : नाशिकमध्ये बड्या अधिकऱ्यावर तोंड लपविण्याची नामुष्की, ACB अधिकाऱ्यांनी रंगेहाथ आवळल्या मुसक्या

VIDEO : नाशिकमध्ये बड्या अधिकऱ्यावर तोंड लपविण्याची नामुष्की, ACB अधिकाऱ्यांनी रंगेहाथ आवळल्या मुसक्या

नाशिकमध्ये एका बड्या अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली आहे. या अधिकाऱ्याला ACB अधिकाऱ्यांनी 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 24 ऑगस्ट : नाशिकमध्ये एका बड्या अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली आहे. या अधिकाऱ्याला ACB अधिकाऱ्यांनी 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार यांना अटक केली आहे. जिल्हा परिषदेतील सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने या प्रकरणी तक्रार केली होती. लांजेवार यांनी रजा रोखीकरणाचे 15 लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागितली होती. मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार यांनी एका सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडे लाच मागितली होती. या अधिकाऱ्याचे रजा रोखीकरणाचे 15 लाखाचे बिल मंजूर करायचे होते. त्यासाठी संबंधित अधिकारी लांजेवार यांच्याकडे गेली होती. पण लांजेवार यांनी बिल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केली. लांजेवार यांनी बिल मंजूर करण्यासाठी चक्क 20 हजार रुपये मागितले होते. पर्याय नसल्याने पीडित अधिकाऱ्याने लाच देण्यास होकार दिला होता. ( पुण्यात पोलिसांच्या धाडीत लॉजवर मिळाल्या 3 बंगाली तरुणी; सेक्स रॅकेटसाठी असा होता प्लान ) पीडित निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने विचार केला. यावेळी आरोपी अधिकाऱ्याच्या मुजोर कारभाराविरोधात कारवाई व्हायला हवी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांना एसीबीकडे तक्रार करण्याचा विचार मनात आला. त्यांनी त्यानुसार एसीबी कार्यालयात जावून तक्रार दाखल केली. एसीबी अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारीची दखल घेत कारवाईला सुरुवात केली.

जाहिरात

एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचला. एसीबी अधिकारी आणि पोलिसांनी पीडित तक्रारदाराला लाचेचे पैसे देण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी पैसे देवू केले. नेमकं त्याचवेळी एसीबी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. अशाप्रकारे एसीबी अधिकाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार यांना रंगेहात अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात