जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्यात पोलिसांच्या धाडीत लॉजवर मिळाल्या 3 बंगाली तरुणी; सेक्स रॅकेटसाठी असा होता प्लान

पुण्यात पोलिसांच्या धाडीत लॉजवर मिळाल्या 3 बंगाली तरुणी; सेक्स रॅकेटसाठी असा होता प्लान

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

वेश्याव्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन बुकिग घेऊन सेक्स रॅकेट चालविणाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 24 ऑगस्ट : वेश्या व्यवसाय हा गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी पोलिसांचं सातत्याने धाडसत्र सुरुच असतात. तरीही गुन्हेदार कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा व्यवसायच सुरुच ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका गोष्टीचा भांडाफोड पुणे पोलिसांनी केला आहे. वेश्या व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन बुकिग घेऊन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे प्रकरण? पिंपरी चिंडवडमधील वाकड येथील रांजना लॉजवर धाड टाकून सामाजिक सुरक्षा पथकाने ऑनलाइन सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील तीन मुलींची सुटका केली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीनही मुली ह्या पश्चिम बंगालतील सिलीगुडीच्या रहिवासी आहेत. तसेच हा ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रॉनी बच्चालाल भारती, अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर आणि वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले या तीन आरोपींविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 370,  3, 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम चार-पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले आणि राणी बच्चनलाल भारती या दोन आरोपींना अटक केली आहे. तर अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर हा आरोपी अजूनही फरार आहे. आधी गँगरेप…नंतर भावाची हत्या करून मृतदेह गावात लटकवला; देशातील संतापजनक घटना ऑनलाईन सेक्स रॅकेट वाढतंय? वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना यात ओढलं जातं. यासाठी मानवी देहव्यापार वाढला आहे. धक्कादायक म्हणजे यात अल्पवयीन मुला-मुलींचाही वापर होत आहे. याला व्यसन घालण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहे. मात्र, तरीही गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी केल्या जात आहे. यासाठी आता सोशल मीडियाचाही वापर वाढला आहे. गेल्या काही वर्षात ऑनलाईन सेक्स रॅकेट वाढत असल्याचंही दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील हे रॅकेट त्यातलाच प्रकार होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात