जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिर्डीतील हॉटेलमधून एक दहशतवादी ताब्यात; नागरिकांमध्ये खळबळ

शिर्डीतील हॉटेलमधून एक दहशतवादी ताब्यात; नागरिकांमध्ये खळबळ

शिर्डीतील हॉटेलमधून एक दहशतवादी ताब्यात; नागरिकांमध्ये खळबळ

पंजाब आणी महाराष्ट्र ATS पथकाने शिर्डीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतले आहे. शिर्डीत दहशतवादी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी, 20 ऑगस्ट : पंजाब राज्यातील पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याला पंजाब आणी महाराष्ट्र ATS पथकाने शिर्डीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतले आहे. शिर्डीत दहशतवादी सापडल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब राज्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीखाली स्फोटके ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रविंदर नामक दहशतवाद्याला महाराष्ट्र आणी पंजाब एटीएसने संयुक्त कारवाई करत शिर्डीतील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्रीनंतर पथकाने शिर्डीतील पिंपळवाडी रोडलगत असणाऱ्या हाॅटेल गंगा येथून रविंदर यास ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे शिर्डी पोलिसांना या कारवाईबाबत कुठलीही माहिती नव्हती. आज सकाळी एटीएस पथकाने शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी रविंदर यास ताब्यात घेतल्याची नोंद केली आणि त्यास पंजाबकडे घेऊन निघाले आहेत. BREAKING : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी, 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा दरम्यान या घटनेमुळे शिर्डीत खळबळ उडाली असून एखाद्या दहशतवाद्याला शिर्डीतील हाॅटेलमध्ये रूम कशी दिली गेली? बनावट नावाने त्याने रूम घेतली होती का? असेल तर हाॅटेलमध्ये एकट्याला रूम कशी देण्यात आली? शिर्डी पोलिसांचे शहरातील हाॅटेल लाॅजवर नियंत्रण नाही का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी दरम्यान, 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सराखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे. ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात