नाशिक, 25 नोव्हेंबर : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात एका चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 23 नोव्हेंबरला समोर आली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं या आश्रम शाळेत राहतात, त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर या घटनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या घटनेचा तपास त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून सुरू आहे. या आधार आश्रमातील हत्येप्रकरणी अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार आश्रमात एका चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली आरोपी अल्पवयीन मुलाने दिली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन संशयिताला याप्रकरणी अटक कली आहे. काय आहे प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक विशाल शिंगारे असं या चार वर्षाच्या बालकाचे नाव आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात सोमवारी चार वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला ही हत्या आहे की आत्महत्या आहे अशी चर्चा सुरू असताना ही हत्या असल्याचं समोर आल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा - 1500 फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर अंघोळ करत होते, पाय घसरला आणि… पहाटे 6 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका ट्रॅक्टरजवळ आलोकचा मृतदेह आढळून आला होता. या ठिकाणी असलेल्या एका मुलाने हा मृतदेह बघितल्यानंतर त्याने संस्थाचालकांना याची माहिती दिली आणि त्यानंतर संस्था चालकांनी आलोकला उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्यास वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. त्र्यंबकेश्वर येथील हे आधार तीर्थ आश्रम हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभारण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी इतरही गोरगरिबांची मुलंही दाखल करण्यात आली आहे. आश्रम शाळेत यापूर्वी देखील मुलांचा छळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.