जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रेमभंगातून गावठी कट्ट्याने स्वत:वरच झाडली गोळी, Valentine's Day च्या काही तास आधी संपवलं आयुष्य

प्रेमभंगातून गावठी कट्ट्याने स्वत:वरच झाडली गोळी, Valentine's Day च्या काही तास आधी संपवलं आयुष्य

प्रेमभंगातून गावठी कट्ट्याने स्वत:वरच झाडली गोळी, Valentine's Day च्या काही तास आधी संपवलं आयुष्य

व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine’s Day) काही तास आधी एक धक्कादायक माहिती नाशिकमधून समोर येत आहे. एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 13 फेब्रुवारी: व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine’s Day) काही तास आधी एक धक्कादायक माहिती नाशिकमधून (Nashik Suicide Case) समोर येत आहे. एका तरुणाने  प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस तपासात ही माहिती समोर आली. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात गोळ्या झाडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपासाची सूत्र हलवली आणि यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना या प्रकरणातील तपासादरम्यान एक आधार कार्ड मिळाले आहे, ज्यानुसार सदर मृत तरुणाचे नाव रोहित राजेंद्र नागरे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर अशी माहिती समोर आली की, या तरुणाने प्रेमभंगातून आत्महत्या केली आहे. त्याने गावठी कट्टा वापरत स्वत:वर गोळ्या झाडल्या.  मृतदेहाशेजारीच पोलिसांना पिस्तूल देखील सापडलंआहे. त्याआधारे शोध लावत नाशिक पोलीस प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोहोचले आहेत. (हे वाचा- नवऱ्याची बँक स्टेटमेंट्स मिळवणं पडलं महाग, मुंबईच्या महिलेची कोठडीत रवानगी ) दरम्यान आता असा प्रश्न देखील उपस्थित होतोय की या तरुणाकडे हा गावठी कट्टा आला कुठून? आता पोलिसांकडून हा देखील तपास सुरू आहे की, या तरुणाकडे गावठी कट्टा कुठून आला?  याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान येत्या व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घटना चिंताजनक आहेत. अवघ्या 4 दिवसातील तिसरी घटना असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात