येवला, 17 ऑगस्ट : शेती कसण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून सख्या मोठ्या भावाने लहान भावाचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक आणि भावा-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या चांदगावात घडली.
साहेबराव कांदळकर असं मयताचे नाव असून त्याच्या हत्ये प्रकरणी आरोपी नंदू कांदळकरला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवल्यापासून जवळ असलेल्या चांदगाव इथं साहेबराव कांदळकर आणि नंदू कांदळकर हे सख्ख्ये भाऊ वेगवेगळे आपापल्या कुटुंबीयांसोबत राहतात.
डॉक्टरांच्या विधानावरून संजय राऊतांचे स्पष्टीकरण, भाजपला लगावला सणसणीत टोला
दोघांकडे 3-3 एकर जमीन आहे. जमीन कसण्यावरून साहेबराव आणि नंदूमध्ये नेहमीच वाद होत होता. आज पुन्हा जमीन कसण्यावरून वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारी केली.
त्यानंतर संतापाच्या भरात नंदूने साहेबरावच्या डोक्यावर लाकडी दांडूक्याने जोरदार प्रहार केला. हा प्रहार इतका जोरात होता की, तो जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पाहून नंदूने घटनास्थळावरून पळ काढला. साहेबरावला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नवनीत राणा लढल्या आणि जिंकल्या, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले व त्यांनी आरोपी नंदूला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तुरुंगात गेला. रागाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.