मुंबई 23 नोव्हेंबर : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आज एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जात आहेत. आदित्य ठाकरे याठिकाणी बिहारची राजधानी पाटणा इथे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावरुन आता नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्यांनी बाळासाहेबांचा नेहमी विरोध केला, त्या लोकांना हे जाऊन भेटत आहेत, असं नरेश म्हस्के यावेळी बोलताना म्हणाले. नरेश म्हस्के बिहार दौऱ्याबद्दल बोलताना म्हणाले, की यांचा जीव मुंबईत अडकला आहे. उत्तर भारतीयांची संख्या पाहता त्यांची मत मिळवण्यासाठी हा बिहार दौरा केला जात आहे. उत्तर भारतीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. ज्या लालूप्रसाद यादव आणि या मंडळींनी नेहमी शिवसेनाचा विरोध केला, कायम ही मंडळी बाळासाहेबांच्या विरोधात बोलली, त्यांना हे जाऊन भेटत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ‘चावट’, बोलीभाषा अन् वाद, एकनाथ खडसेंवर माफी मागायची वेळ पुढे नरेश म्हस्के म्हणाले, की ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचा विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते..ती मंडळी आता यांना जवळची वाटत आहे. हे आपल्या स्वभावाप्रमाणेच चालले आहेत. त्या तेजस्वी यादव यांनी यांना येऊन भेटायला पाहिजे. मात्र, हेच या मंडळींना जाऊन भेटतात.
हार गये यहापर तो
— Naresh Mhaske (@nareshmhaske) November 22, 2022
बिटवा चला बिहार,
कुर्सी दो, कुर्सी दो
यही इसकी पुकार ! @AUThackeray@abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @News18lokmat @saamTVnews @JayMaharashtrN @news_lokshahi pic.twitter.com/aVYqtm9kjr
मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी भेटायला जातात तेव्हा हे लोक टीका करतात. मात्र, आता हे तर एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला चाललेत. काय वेळी आली आहे. केवळ लाचारी आणि लाचारी, उत्तर भारतीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं चाललं आहे. कदाचित एखादं पेंग्विन पार्कसुद्धा काढायचं असेल, त्याच्यासाठी हा दौरा असेल, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोलाही लगावला. नरेस म्हस्के यांनी आपल्या ट्विटवरुन शेअर केलेल्या या प्रतिक्रियेच्या व्हिडिओला कॅप्शनही दिलं आहे. ‘हार गये यहापर तो..बिटवा चला बिहार, कुर्सी दो, कुर्सी दो..यही इसकी पुकार!’ असा टोला त्यांनी कॅप्शनमधून लगावला. शिवसेनेतल्या भुकंपानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राबाहेर, भाजपला ‘फाईट’ देणाऱ्या नेत्याला भेटणार! आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मातोश्रीहून सकाळी साडेदहा वाजता निघतील. यानंतर मुंबई एअरपोर्टवरून साडेअकरा वाजता टेक ॲाफ करतील. दुपारी 2 वाजता ते पाटणा एअरपोर्टवर लॅंडिंग करतील. 3 वाजता RJD नेता आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतील. यानंतर संध्याकाळी मुंबईला परततील.