Home /News /maharashtra /

शिवसेनेविरोधात राणे समर्थकांची डरकाळी; थोड्याच वेळात जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू

शिवसेनेविरोधात राणे समर्थकांची डरकाळी; थोड्याच वेळात जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू

केंद्रीय मंत्री नारायण राणे नुकतेच रत्नागिरी विमानतळावर पोहोचले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे नुकतेच रत्नागिरी विमानतळावर पोहोचले आहेत.

Konkan Janashirwad Yatra: केंद्रीय मंत्री नारायण राणे नुकतेच रत्नागिरी विमानतळावर पोहोचले आहेत. वादग्रस्त घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ करणार आहेत.

    रत्नागिरी, 27 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात आंदोलन करत शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून राणे यांना अटक (Narayan Rane Arrest) देखील करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशीरा राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मागील चार पाच दिवसांपासून राज्यात वादग्रस्त घडामोडी घडल्यानंतर आता राणे पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत. आज बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे नुकतेच रत्नागिरी विमानतळावर पोहोचले आहेत. वादग्रस्त घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा जनआशीर्वाद  यात्रेला प्रारंभ करणार आहेत. आज रत्नागिरीतून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'योद्धा पुन्हा मैदानात' अशा आशयाचा उल्लेख असणारे बँनर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. हेही वाचा- ''संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात'' ; अनिल परबांच्या समर्थनात शिवसेनेचे बॅनर्स शिवसेनेनं राणेंविरोधात 'कोंबडी चोर' लिहिलेला बॅनर लावल्यानंतर राणे समर्थकांनी देखील जशास तसं उत्तर दिलं आहे. निलेश राणे यांनी देखील हा बॅनर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. वादग्रस्त टिप्पणीनंतर थांबवण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेला आज पुन्हा रत्नागिरीतून प्रारंभ केला जाणार आहे. नारायण राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात जनतेचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. हेही वाचा-मुंबई भाजपमध्ये गुजराती VS मराठी वाद, उपाध्यक्षांच्या राजीनाम्यानं खळबळ सिंधुदुर्ग तसंच कणकवली शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसलीय. तसेच राणेप्रेमींनी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Narayan rane, Ratnagiri

    पुढील बातम्या