• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ''संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात'' ; अनिल परबांच्या समर्थनात शिवसेनेचे बॅनर्स

''संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात'' ; अनिल परबांच्या समर्थनात शिवसेनेचे बॅनर्स

Anil Parab: अनिल परब सध्या भाजपच्या रडारवर आहेत. आता मुंबईतील शिवसैनिकही अनिल परब यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद उफाळून निघाला आहे. राणे यांच्या अटकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. त्यानंतर अनिल परब सध्या भाजपच्या रडारवर आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे राणे यांना अटक होण्यामागे अनिल परब असल्याचं बोलले जात आहे. त्यानंतर राणेंनी परब यांची सर्व प्रकरणं उकरुन काढणार असल्याचा इशारा दिला. अनिल परब यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनाही अनिल परब यांच्या समर्थनात पुढे सरसावली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरीमध्ये अनिल परब यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्तानी जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग परिसरात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर "संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात. अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.''असं लिहिण्यात आलं आहे. राजू श्रीपाद पेडणेकर या शिवसेना नगरसेवकाने ही बॅनरबाजी केली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: