जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आशुतोष ठाकर यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ, भातखळकरवरही केले गंभीर आरोप

मुंबई भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आशुतोष ठाकर यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ, भातखळकरवरही केले गंभीर आरोप

 बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं मोठा विजय साकारला आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं मोठा विजय साकारला आहे.

मुंबई भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. उपाध्यक्षांनी आपला पदाचा राजीनामा दिला असून गंभीर आरोप केलेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंचं ढवळून निघालं आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा वाद पेटला असताना आता भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आता मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) उपाध्यक्षांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांच्यावर चुकीच्या वागणुकीचा आरोप केला आहे. मुंबई भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पत्र त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

जाहिरात

त्यांनी आपल्या Tweet मध्ये म्हटलं की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, होय, माझ्यासाठी तुम्ही सर्वोच्च आहात. पक्षाशी माझी निष्ठा नेहमीच राहील. पण मी दिलेल्या कारणांमुळे भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. अतुल भातखळकर जी यांच्या कार्यालयात आज जे घडले ते निंदनीय आहे! या राजीनामा पत्रात आशुतोष यांनी आमदार अतुल भातखळकर यांच्या चुकीच्या वागणुकीचाही आरोप केला आहे. आशुतोष हे जेव्हा भातखळकर यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या पत्रात लिहिला आहे. हेही वाचा-  Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीनं जग जिंकलं; कोल्हापूरच्या अमृताला जागतिक कंपनीनं दिलं 41 लाखांचं पॅकेज एवढंच काय तर मी गुजराती आहे म्हणून माझा अपमान केला आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात मुंबईचे विद्यमान अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना सवाल केला आहे. आशुतोष ठाकर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये गुजराती विरुद्ध मराठी अशी अंतर्गत गटबाजी सुरु असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार पंतप्रधान मोदी यावर काय करणार हे बघावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात