Home /News /maharashtra /

''नारायण राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करुन शॉक दिला पाहिजे'', गुलाबराव पाटील यांची बेधडक प्रतिक्रिया

''नारायण राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करुन शॉक दिला पाहिजे'', गुलाबराव पाटील यांची बेधडक प्रतिक्रिया

नारायण राणे आणि शिवसेना (shivsena) असा वाद पेटला आहे.

    जळगाव, 24 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray) केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसैनिक भलतेच आक्रमक झालेत. त्यामुळे नारायण राणे आणि शिवसेना (shivsena) असा वाद पेटला आहे. शिवसेने नेते याप्रकरणावर नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेत आहेत. आता शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यावर बेधडक प्रतिक्रिया (Reaction)दिली आहे. नारायण राणे यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करून शॉक दिला पाहिजे अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने विद्यमान मुख्यमंत्री यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाची गरिमा काय असते याची माहिती आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे याचे त्यांना भान नसेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे वेळ पडली तर त्यांना शॉक सुध्दा दिले पाहिजे, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. सकाळनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ''नारायण राणेंचा फुगा फुटलेला आहे, सध्या ते ऑक्सिजनवर आहेत'' अंगातलं भूत उतरवण्याची गरज पुढे ते म्हणतात की, नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यावेळीही विरोधी पक्ष होते. त्यावेळी विरोधी पक्षाकडे एक गरिमा होती. मात्र आता गरिमा नसलेले विरोधी पक्ष राज्यात आला आहे. मला तर वाटते यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय असे मला वाटते आहे. कोणत्या तरी भक्ताकडे नेऊन यांच्या अंगातील भूत उतरवण्याची गरज आहे. नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागण्याची गरज नसल्याचं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. यावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागण्याचीही नारायण राणे यांची लायकी नाही. काय बोलतो याचा बोलताना त्यांनी विचार करावा. बोलताना कसं बोलावं हे मला त्यांना सांगावं लागतंय याचीच मला किंव येते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Narayan rane, Shivsena

    पुढील बातम्या