कुडाळ, 28 ऑक्टोबर : भारतातल्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. केजरीवाल यांच्या या मागणीनंतर मोठा वाद निर्माण झाला. केजरीवालांच्या या मागणीनंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो नोटांवर असावेत अशी मागणी केली.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावून सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. या प्रकरणी कोकणातले भाजप आणि राणे समर्थक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी
'नारायण राणेंचा फोटो अशोकस्तंभाच्या जागी लावून अशोकस्तंभाची विटंबना करण्यात आली आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं आहे. गुन्हा दाखल व्हायची प्रोसेस सुरू आहे. यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे,' असं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
हे बरं आहे का? pic.twitter.com/slEX6PIxpc
— Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya8) October 27, 2022
नोटांवरील फोटोंवरून राजकारण जोरात, ठाकरेंच्या शिवसेनेला हवे बाळासाहेब!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते. या फोटोंविरोधात कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane