मुंबई, 27 ऑगस्ट : नोटांवरच्या फोटोंवरून सुरू असलेल्या वादावरून फक्त देशभरातच नाही तर महाराष्ट्रातलं राजकारणही जोरात सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सगळ्यात आधी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा, अशी मागणी केली. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटायला सुरूवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी नोटांवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असावा, अशी प्रतिक्रिया दिली. ‘शिवसेनेने कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे नोटांच्या राजकारणात या भानगडींमध्ये शिवसेना जात नाही. पण कुणाचा फोटो असायला पाहिजे, असं विचाराल तर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे, असं मी सांगेन. माझा नेता असावा असं प्रत्येकाला वाटत असेल, तर मी शिवसेनेचा आहे. मला असं वाटतं बाळासाहेबांचा असायला पाहिजे, पण माझ्या वाटण्याला काहीही महत्त्व नाही. नोटेवर कुणाचा फोटो असायला पाहिजे, हे सरकार ठरवतं. हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत,’ असं अनिल परब म्हणाले.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
दरम्यान अनिल परब यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांचा फोटो नोटेवर असावा, ही सगळ्यांचीच मनोमन इच्छा आहे, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे? काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, तशी वेळ आली तर पक्ष बंद करेन, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण तुम्ही बाळासाहेबांचं वचन मोडलत, अशी टीका राम कदम यांनी केली. मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी राम कदम यांनीच नोटांचे काही फोटो त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या नोटा आहेत.
Ye perfect hai ! 😊 pic.twitter.com/GH6EMkYeSN
— nitesh rane (@NiteshNRane) October 26, 2022
भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली 200 रुपयांची नोट शेअर केली आहे. ये परफेक्ट है, असं कॅप्शन नितेश राणे यांनी या फोटोला दिलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी नोटेवर गौतम बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे.

)







