मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Narayan Rane Arrest : नारायण राणेंना आणखी एक दिलासा, कोर्टात घडली महत्त्वाची घडामोड

Narayan Rane Arrest : नारायण राणेंना आणखी एक दिलासा, कोर्टात घडली महत्त्वाची घडामोड

 राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. राणेंची प्रकृती पाहत महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. राणेंची प्रकृती पाहत महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. राणेंची प्रकृती पाहत महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

  • Published by:  sachin Salve
महाड, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery)  यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना जामीन मिळाला आहे. मात्र, नाशिक आणि पुणे पोलिसांनी सुद्धा न्यायालयात ताबा मागितला नाही. त्यामुळे राणेंना आणखी एक दिलासा मिळाला आहे. नारायण राणे यांना रात्री उशिरा महाडमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. राणेंची प्रकृती पाहत महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, नाशिकमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे राणे यांना जामीन जरी मिळाला असला तरी नाशिक पोलीस ताबा मागण्याची शक्यता होती. मात्र गृह विभागाच्या आदेशाकडून कोणताही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांकडून अटकेची कारवाई टळली आहे. कोर्टात काय घडलं? नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली. राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे.  राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरी तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. नारायण राणे यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यामुळे महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, राणे यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सुद्धा महाड शहरांमध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरी, रायगड, मुंबई या विविध भागातून राणेसमर्थक मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते समोर समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
First published:

पुढील बातम्या