जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नंदुरबारमध्ये वाळू माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर हल्ला, अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

नंदुरबारमध्ये वाळू माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर हल्ला, अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांचा हैदोस; मंडळ अधिकारी आणि तलाठ्यावर हल्ला, अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांचा हैदोस; मंडळ अधिकारी आणि तलाठ्यावर हल्ला, अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

Sand Mafia attacks on government officers: नंदुरबार जिल्ह्यात वाळू माफियांनी मंडळ अधिकारी आणि तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारण्याचा प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 14 जानेवारी : राज्यात वाळू माफियांचा (Sand Mafia) हैदोस सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून ही बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात (Taloda Taluka Nandurbar) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तळोदा तालुक्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होते. याची माहिती मिळताच घटास्थळी स्थानिक मंडळ अधिकारी आणि तलाठी दाखल झाले. कारवाईसाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना पाहून वाळू माफिया चांगलेच संतापले आणि त्यांनी मडंळ अधिकारी, तलाठीच्या अंगावर टॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.

News18

तळोदा तालुक्यातील नळगव्हाण गावाजवळील वाल्हेरी नदी पात्रातून वाळू माफिया वाळुची तस्करी करत होते. यावेळी मंडळ अधिकारी आणि तलाठी त्यांच्यावर कारवाईसाठी गेले होते. आरोपींनी ट्रॅक्टरमधील वाळुची ट्रॉली उचकवून घटनास्थळावरुन पळ काढला आहे.

null

महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. आरोपी गुजरात राज्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

null

यवतमाळमध्ये वाळू माफियाचा चाकू हल्ला गेल्यावर्षी वाळू माफियांनी तहसीलदारांवर चाक हल्ला केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली होती. यवतमाळ जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. रात्री 11 च्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रोडवर रेती तस्करांकडून वाहतूक सुरू होती. वाहतुकीला रोखण्यासाठी वैभव पवार आणि गजानन सुरोहशे गेले होते. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर दोघांवर हल्ला करण्यात आला होता. यात वैभव पवार यांच्या पोटात चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारकरिता त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात