जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर वाळू माफियाचा चाकू हल्ला, यवतमाळमधील घटना

नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर वाळू माफियाचा चाकू हल्ला, यवतमाळमधील घटना

नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर वाळू माफियाचा चाकू हल्ला, यवतमाळमधील घटना

शनिवारी रात्री 11 च्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रोडवर रेती तस्करांकडून वाहतूक सुरू होती. वाहतुकीला रोखण्यासाठी…

  • -MIN READ
  • Last Updated :

भास्कर मेहरे, प्रतिनिधी वर्धा, 24 जानेवारी : यवतमाळ जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला आहे. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रोडवर ही घटना घडली आहे.  अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यास गेलेले उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोहशे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. रात्री 11 च्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रोडवर रेती तस्करांकडून वाहतूक सुरू होती. वाहतुकीला रोखण्यासाठी वैभव पवार आणि गजानन सुरोहशे गेले होते. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर दोघांवर हल्ला करण्यात आला. यात वैभव पवार यांच्या पोटात चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने  उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारकरिता त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली असून आरोपी अविनाश चव्हाण व त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कलम लावून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश SDPO, SDO यांना दिले आहे. तसंच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात