मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: दत्ताचा अवतार सांगत फसवणूक, डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक

VIDEO: दत्ताचा अवतार सांगत फसवणूक, डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक

दत्ताचा अवतार सांगत डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा, भाविकांच्या रक्ताने अभिषेक करणारा भोंदूबाबा गजाआड

दत्ताचा अवतार सांगत डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा, भाविकांच्या रक्ताने अभिषेक करणारा भोंदूबाबा गजाआड

Fake godman arrested in Nanded: स्वत:ला दत्ताचा अवतार सांगत नागरिकांची फसवणूक करणारा भोंदूबाबा अटकेत.

नांदेड, 14 ऑक्टोबर : स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून भक्तांना गंडवणाऱ्या बाबाला नांदेड (Nanded)मध्ये अटक करण्यात आली आहे. गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करण्यात हा भोंदूबाबा तरबेज होता. नांदेड जिल्ह्यातील माहूर (Mahur) येथे कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले (Fake baba kapile maharaj) या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Fake godman vishwajeet kapile arrest)

या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर बाबासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबासह तीन जणांना माहूर पोलिसांनी अटक केली आहे.

मागील तीन वर्षांपासून माहूर येथे टीनशेट उभारून या भोंदूबाबाने अघोरी कृत्य सुरू केले. गुप्तधन शोधून देणे, कुटुंबातील सदस्याला नोकरी लावणे, कौटुंबिक कलह दूर करणे, आजार बरे करणे यासाठीच दत्तप्रभूंचा अवतार म्हणून आलो असल्याचे तो भक्तांना सांगत होता. त्यासाठी मांडूळ, कासवाची पूजा करीत असे. यज्ञ करून त्याची राख खायला देणे, यज्ञात भाविकांचे रक्त टाकून रक्ताभिषेक करणे, असे अघोरी कृत्य तो करीत होता. त्यासाठी भक्तांकडून बाबाने लाखो रुपये उकळले.

डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोंदूबाबाने तब्बल 24 लाख रुपयांचा गंडा घातला. तर पुण्यातील एकाची अशाच प्रकारे फसवणूक केली. शेरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली. त्यांनंतर त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विश्वजित कपिले याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केला.

मुंबईतील उच्चशिक्षित तरुणी बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकली

प्रियकराला वश करण्याच्या नावाखाली मुंबईतील एका भोंदूबाबानं युवतीला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. संबंधित भोंदूबाबानं विविध पूजा, बळी सांगून पीडितेकडून अधिकचे पैसे उकळले आहेत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित युवतीनं खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात जादूटोणा आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वासिम रइस खान ऊर्फ बाबा कबीर खान बंगाली ऊर्फ बाबा बंगाली असं अटक केलेल्या भोंदूबाबाचं नावं आहे. संबंधित आरोपी सार्वजानिक ठिकाणी दैनंदिन आयुष्यातील अडचणी दूर करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातील लावून नागरिकांची फसवणूक करत होता. 24 वर्षीय फिर्यादी तरुणीही बंगाली बाबाची हीच जाहीरात पाहून आरोपीच्या जाळ्यात गुंतली होती.

First published:

Tags: Crime, Nanded