Home /News /maharashtra /

नांदेडमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाची दादागिरी, खंडणी प्रकरणी जेलमध्ये, शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

नांदेडमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाची दादागिरी, खंडणी प्रकरणी जेलमध्ये, शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

 शिवसेना माजी नगरसेवक अशोक उमरेकर आणि काँग्रेस नगरसेवक पुत्र अक्षय रावत

शिवसेना माजी नगरसेवक अशोक उमरेकर आणि काँग्रेस नगरसेवक पुत्र अक्षय रावत

नांदेडमध्ये खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नगरसेवक पुत्राला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणात शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार आहे.

नांदेड, 5 जुलै : नांदेडमधून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. लोकप्रतिनिधींना आपण देव मानतो. त्यांना आपण जनतेचं सेवक मानतो. वेळप्रसंगी जनतेसाठी धावून जाणारे कैवारी मानतो. त्यांच्या कामांमुळे नागरीक त्यांना देवाची उपमा देतात. त्यांच्याकडे आशेने बघतात. पण त्यांच्याकडून किंवा त्यांच्याशी संबंधित कुणाकडून सर्वसामान्यांची फसवणूक, गळचेपी किंवा लुटमार झाली तर सर्वसामान्यांनी कुणाकडे जायचं? असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात जनतेकडे पोलिसांचा पर्याय आहे. पण ही वेळ येऊच कशी शकते? अशा प्रश्नाने सर्वसामान्य कासावीस होतात. नांदेडमध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला जेलमध्ये जावं लागलं आहे. त्याने खंडणी मागितल्यामुळे पीडितांनी त्याच्याविरोधात पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर एक शिवसेनेचा माजी नगरसेवक हा फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याचादेखील शोध घेत आहेत. नांदेडमध्ये खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नगरसेवक पुत्राला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणात शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार आहे. खरेदी केलेल्या दुकानांचा ताबा देण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाचा पुत्र अक्षय रावत शिवसेनेचा माजी नगरसेवक अशोक उमरेकर याच्यासह अन्य दोन जणांविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय रावत याला पोलीसांनी काल अटक केली. अक्षय रावतला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अक्षय रावतला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अन्य आरोपी फरार आहेत. (उद्धव ठाकरेंचा 'रिक्षावाल्या'वर निशाणा, एकनाथ शिंदेंचं 'मर्सिडिज' काढून प्रत्युत्तर) नेमकं प्रकरण काय? खरेदी केलेल्या दुकानांचा ताबा देण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर 4 ते 5 आरोपींविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दत्तनगर भागात राहणारे सुदाम राऊत यांनी 2 दुकाने खरेदी केली होती. पण या दुकानांचा वाद उपस्थित करून ताबा देण्यासाठी आरोपींनी 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. काल अक्षय रावत याला पोलीसांनी अटक केली. अक्षय रावतला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अक्षय रावत ला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या