जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nanded Firing Case : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार

Nanded Firing Case : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार

Nanded Firing Case : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार

नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या महीला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

  • -MIN READ Nanded,Maharashtra
  • Last Updated :

नांदेड, 10 जानेवारी : नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या महीला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल (दि.09) रात्री ही घटना घडली. सविता गायकवाड ह्या आपल्या स्कूटीवरुन रात्री मगनपुरा येथून आपल्या घरी जात होत्या. उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोपी कोण होते. त्यांनी हल्ला का केला याचा तपास सुरू आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहिनुसार, नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या महीला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल (दि.09) रात्री ही घटना घडली. सविता गायकवाड ह्या आपल्या स्कूटीवरुन रात्री मगनपुरा येथून आपल्या घरी जात होत्या. उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार केला.  

हे ही वाचा :  एकतर्फी प्रेमातून आठवणीतील विद्यार्थ्याचं कांड; 11 वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत धक्कादायक कृत्य

यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोपी कोण होते. त्यांनी हल्ला का केला याचा तपास सुरू आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे.

निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मित्रालाच केलं ठार,

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन तीन आठवडे झाले असले तरी त्याचे अद्यापही पडसाद उमटत आहेत. बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीवरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणुकीच्या विरोधात काम केल्याच्या रागातून तिघांना बेदम मारहाण झाली होती. या दरम्यान तिघांमधील एकाला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या आष्टी शहरात घडली होती.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ आणि अन्य एकास घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीडच्या आष्टी शहरात दोन दिवसापूर्वी घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात