लखनऊ 09 जानेवारी : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका मुलाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिच्या डोक्याला कुंकू लावलं. आरोपीही अल्पवयीन असून तो आठवीत शिकत असल्याचं सांगण्यात येत आहे. हा मुलगा अनेकदा मुलीचा विनयभंग करत होता, असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीने शाळेत जाणंही बंद केलं होतं. स्थानिक लोकांनी सांगितलं की, दोघेही गावातील एकाच शाळेत शिकायचे आणि मुलगा अनेकदा मुलीला त्रास देत असे. गावात बदनामी होईल या भीतीने मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणाकडे तक्रार केली नाही आणि तिचं नाव शाळेतून काढून टाकल्यानंतर तिला गावातील दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. असं असतानाही तो मुलगा थांबला नाही. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो सतत या मुलीच्या आसपास फिरत असे. शनिवारी सायंकाळी चार वाजता हा मुलगा मित्रासह दुचाकीवरून विद्यार्थिनीच्या घरी पोहोचला आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवून तिच्या डोक्यामध्ये कुंकू भरलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जुनेबाईल न्यायालयात हजर करण्यात आलं. भिवंडी : तुझ्यासोबत बोलायचंय, दरवाजा बंद करुन आत नेऊन तृतीयपंथीयासोबत धक्कादायक कृत्य पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी त्यांची मुलगी घराबाहेर झाडू मारत होती. आरोपीने दुचाकीवरून खाली उतरून तिचा दुपट्टाही खेचला. त्यानंतर परिसरातील लोकांसमोर मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला सिंदूर लावून पळ काढला. यादरम्यान त्याला पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र दोघेही कोणाच्या हाती लागले नाहीत. दुसरीकडे, याप्रकरणी डेप्युटी एसपी अजय सिंह चौहान यांनी सांगितलं की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध कलम ३५४, ३५४ बी आणि ३५२ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विद्यार्थ्याला अल्पवयीन असल्याने रविवारी जुनेबाइल न्यायालयात हजर करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.