नांदेड, 18 जून : नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांच्या हत्येनंतर त्यांच्या संपत्तीचा वाद सुरू झाला आहे. संजय यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी त्यांच्या संपत्तीचा वारसदार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आणखी एका महिलेनं त्यावर आक्षेप घेत कोर्टात दावा सादर केला आहे. आपण आणि आपली चार वर्षांची मुलगी त्यांच्या संपत्तीची खरी वारसदार असल्याचा दावा या महिलेनं केला असून तसा अर्जही कोर्टात सादर केला आहे. या प्रकरणात 24 जून रोजी सुनावणी होणार आहे.
कौटुंबिक कलह उघड
काही दिवसांपूर्वी बियाणी यांच्या कुटुंबातील वाद उघड झाला होता. संजय बियाणी यांचा भाऊ प्रवीण बियाणी आणि पत्नी अनिता बियाणी यांनी परस्परांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आणखी एका महिलेनं आपणच वारसदार असल्याचा दावा केल्यानं या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार याकडं संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलंय.
गोळ्या झाडून हत्या
संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी दोन मारेकऱ्यानी गोळ्या झाडून हत्या केली होती . . संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या झालेल्या हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला होता. तसंच बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांना या हत्येच्या छडा लावण्यात यश आलं. या प्रकरणात आत्तापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची मोठी फसवणूक; घातला 10 लाखाचा गंडा
संजय बियाणी हे नाव नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे ते रहिवाशी होते. 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडला स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी स्थानिक केबल नेटवर्कमध्ये जाहिरात एजन्सी चालवली. नंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ते मोठे व्यावसायिक झाले. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.